-->

मंगरूळपीरमध्ये ९५ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ!

मंगरूळपीरमध्ये ९५ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ!

 


साप्ताहिक सागर आदित्य 

📢 मंगरूळपीरमध्ये ९५ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ!


🤝 तहसील कार्यालयात ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विशेष शिबिर उत्साहात


📍 वाशिम, 


नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्या वतीने नुकतेच विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरातून विविध शासकीय योजनांअंतर्गत एकूण ९५ लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला.


🔹 विभागनिहाय लाभार्थी

▪️ महसूल विभाग — २४ लाभार्थी

▪️ भूमी अभिलेख विभाग — २ लाभार्थी

▪️ पंचायत समिती — २६ लाभार्थी

▪️ इतर विभाग — ४३ लाभार्थी


या शिबिराला तहसीलदार सुधाकर अनासुणे, तालुका आरोग्य अधिकारी भाग्यश्री जाधव, भूमी अभिलेख तालुका निरीक्षक श्री. चारथळ, गटविकास अधिकारी सारिका कारले, नायब तहसीलदार रवींद्र राठोड यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


#सेवा_संकल्प_अभियान #मंगरूळपीर #वाशिम #शासकीय_योजना #लोकाभिमुख_प्रशासन #जनसेवा

0 Response to "मंगरूळपीरमध्ये ९५ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article