आपत्ती धोके निवारणासाठी सज्ज राहण्याची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा !
साप्ताहिक सागर आदित्य
🚨 आपत्ती धोके निवारणासाठी सज्ज राहण्याची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा !
📍 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली शपथ
वाशिम, : आपत्तींचे धोके कमी करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत सजगता वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती धोके निवारणाची शपथ दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.
#आपत्तीधोकेनिवारणदिन #आपत्तीव्यवस्थापन #आपत्तीजनजागृती #वाशिम #जिल्हाप्रशासन
0 Response to "आपत्ती धोके निवारणासाठी सज्ज राहण्याची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा !"
Post a Comment