-->

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याचे काम कौतुकास्पद!

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याचे काम कौतुकास्पद!



 साप्ताहिक सागर आदित्य 

🗳️ विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याचे काम कौतुकास्पद!


विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे प्रतिपादन; मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचा सर्वसमावेशक आढावा


📍 वाशिम, 


वाशिम जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण, विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि मतदार जनजागृती उपक्रमांना चांगली गती मिळाली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेले काम कौतुकास्पद असून, पात्र मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न समाधानकारक आहेत, असे प्रतिपादन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, रवी काळे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


📊 प्रारूप मतदार यादीत ८ लाख ८५ हजार २६९ मतदारांची नोंद


जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण ८ लाख ८५ हजार २६९ मतदारांची नोंद आहे. यामध्ये ४ लाख ६१ हजार ८९२ पुरुष, ४ लाख २३ हजार ३६० महिला आणि १७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.


गतदोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी शिबिरांना नागरिकांसह युवा वर्गाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध टप्प्यांवर आयोजित विशेष शिबिरे तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र तरुणाची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ मुद्द्यांची विशेष कार्ययोजना अमलात आणली आहे.


📌 प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश


बैठकीत विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेत प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता राखण्यासोबतच पात्र मतदारांची नोंदणी वाढविण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.


विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेल्या कामाचे कौतुक करून विभागीय आयुक्त गुंडे यांनी मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना गती कायम ठेवण्याचे आवाहन केले.


यावेळी सर्व मतदान नोंदणी अधिकारी आणि सर्व सहायक मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.



#विशेषसखोलपुनरीक्षण

0 Response to "विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याचे काम कौतुकास्पद!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article