-->

लोक अदालत नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वाशिम तथा दंडाधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे

लोक अदालत नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वाशिम तथा दंडाधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वाशिम उपविभागीय कार्यालयात 5 ऑक्टोबरला महसूल लोक अदालत


वाशिम : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार वाशिम तहसील कार्यालयात 'महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' राबविण्यात येत आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत सुरू राहणार आहे.


लोक अदालत-२-१. या अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय,


वाशिम येथे प्रलंबित असलेली मामलतदार न्यायालय अधिनियमातील प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अंतर्गत अपिल प्रकरणे, शेतरस्ते व पांदण रस्त्यांची प्रकरणे तसेच विविध कायद्यांतर्गत सुरू असलेली इतर जमीन विषयक प्रकरणे तडजोडनामा अथवा सामज्यास्याने निकाली काढण्यात येणार आहेत. या लोक अदालतीचे शिबिर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, वाशिम येथील मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संबंधित अपिलार्थी, गैरअपिलार्थी व पक्षकारांनी आपले लेखी म्हणणे किंवा तडजोडनामा अर्ज ३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी उपविभागीय कार्यालयात वाशिम स्वतः किंवा वकिलामार्फत सादर करावा, तसेच शिबिरास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोक अदालत नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वाशिम तथा दंडाधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे.

0 Response to "लोक अदालत नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वाशिम तथा दंडाधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article