वाशिम तहसील कार्यालयात ५ ऑक्टोबरला महसूल लोक अदालत
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम तहसील कार्यालयात ५ ऑक्टोबरला महसूल लोक अदालत
या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी व पक्षकारांनी लाभघ्यावा, असे आवाहन
वाशिम : महसूल व वन
विभाग, महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार वाशिम तहसील कार्यालयात 'महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' राबविण्यात येत आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत सुरू राहणार आहे.
लोक अदालत-२-१. या अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय, वाशिम येथे प्रलंबित असलेली मामलतदार न्यायालय अधिनियमातील प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १४३ अंतर्गत प्रकरणे, शेतरस्ते व पांदण रस्त्यांची प्रकरणे तसेच विविध कायद्यांतर्गत सुरू असलेली इतर जमीनविषयक प्रकरणे तडजोडनामा अथवा सामंजस्याने
निकाली काढण्यात येणार आहेत. या लोक अदालतीचे शिबिर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, वाशिम येथील मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संबंधित वादी, प्रतिवादी व पक्षकारांनी आपले लेखी म्हणणे किंवा तडजोडनामा अर्ज ३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी तहसील कार्यालयात स्वतः किंवा वकिलामार्फत सादर करावा, तसेच शिबिरास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोक अदालत- नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी निलेश पळसकर यांनी केले आहे
0 Response to "वाशिम तहसील कार्यालयात ५ ऑक्टोबरला महसूल लोक अदालत"
Post a Comment