-->

कृषी योजनांच्या लाभासाठी मंगरूळपीरमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी योजनांच्या लाभासाठी मंगरूळपीरमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन



 साप्ताहिक सागर आदित्य 

🌾 कृषी योजनांच्या लाभासाठी मंगरूळपीरमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन


📌 सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबिर


वाशिम,  : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ पंचायत समिती मंगरूळपीर येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ आणि ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना योजनांची सविस्तर माहिती मिळावी आणि उपलब्ध घटकांचा लाभ घेता यावा, यासाठी हे शिबिर घेण्यात आले.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध ठिकाणी लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावर विशेष नियोजन केले आहे.


पंचायत समिती मंगरूळपीर येथे झालेल्या मार्गदर्शन सभेत कृषी विस्तार अधिकारी भागवत भुरकाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, सोलार पंप, इलेक्ट्रिक मोटर पंप, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच आणि पाईपलाईन आदी घटकांचा समावेश आहे. या घटकांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी गटविकास अधिकारी सारिका कारले, जिल्हा कृषी अधिकारी विघयो आणि कृषी अधिकारी संदीप साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन शिबिराला तालुक्यातील बहुसंख्य गावांमधील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृषी योजनांची माहिती घेतली.


#सेवा_संकल्प_अभियान #कृषी_योजना #शेतकरी #मंगरूळपीर #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_कृषी_स्वावलंबन_योजना #बिरसा_मुंडा_कृषी_क्रांती_योजना #वाशिम

0 Response to "कृषी योजनांच्या लाभासाठी मंगरूळपीरमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article