मंगरुळपीर पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
🇮🇳 मंगरुळपीर पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ
🤝 खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात
📍 वाशिम, : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यात येणार असून, मंगरुळपीर पंचायत समिती येथे आज शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला.
🏡 मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्येही सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने शपथ घेण्यात आली. नागरिकांना विविध सेवा सुलभतेने आणि निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
👥 याप्रसंगी मंगरुळपीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सारीका कारले आणि विस्तार अधिकारी वाढणकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहभाग नोंदविला.
#सेवासंकल्पअभियान #मंगरुळपीर #वाशिम #ग्रामपंचायत #लोकसेवा #सेवासंकल्प #SewaSankalpAbhiyan
0 Response to "मंगरुळपीर पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ"
Post a Comment