“सेवा संकल्प” आणि "स्वच्छता ही सेवा 2026" अभियानचा जिल्हास्तरीय शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
“सेवा संकल्प” आणि "स्वच्छता ही सेवा 2026" अभियानचा जिल्हास्तरीय शुभारंभ
ग्राम विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘सेवा सकल्प अभियान’ तसेच पाणी पुरवठवा व स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित ‘स्वच्छता ही सेवा- 2026’ या दोन्ही उपक्रमांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात (दि 17) करण्यात आला.
हे दोन्ही अभियान प्रत्येक गावामध्ये प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांनी सर्व यंत्रणेला दिले. तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे फोटो व माहिती तालुकास्तरावरुन शासनाच्या पोर्टलवर दररोज भरण्याचे निर्देशही देण्यात आले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुखदेव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन खुळे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कान्हेरकर आदींची उपस्थिती होती. तसेच या अभियानाच्या अनुशंगाने प्रत्येक ग्राम पंचायतीसाठी नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी, सर्व उपशिक्षणाधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांना निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या सर्व समाजमाध्यमांवर देण्यात येणारी माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांनी प
गाव आणि तालुकास्तरावरही मोहिमेचा शुभारंभ:
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आणि सहा पंचायत समिती मध्ये “सेवा संकल्प” आणि "स्वच्छता ही सेवा 2026" या दोन्ही अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती मंगरुळपीर येथे गट विकास अधिकारी सारिका कारले, सहा. गट विकास अधिकारी रविंद्र वाढणकर, जिल्हा क्षमता बांधणी संल्लागार प्रफुल्ल काळे यांची यावेळी उपस्थिती होती. अभियानादरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. कारंजा पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी पुनम राणे, सहा. गट विकास अधिकारी परिहार, जिल्हा क्षमता बांधणी संल्लागार पी व्ही काळे यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सामुहिक स्वच्छतेची शपथ घेतली. पंचायत समिती, मालेगाव, रिसोड, वाशिम आणि मानोरा या ठीकाणी सुध्दा या दोन्ही अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
0 Response to "“सेवा संकल्प” आणि "स्वच्छता ही सेवा 2026" अभियानचा जिल्हास्तरीय शुभारंभ"
Post a Comment