-->

सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टूलकिटचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टूलकिटचे वितरण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

🛠️ सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टूलकिटचे वितरण


आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल घडविणारी महत्त्वपूर्ण योजना – आमदार श्याम खोडे


📍 वाशिम,  : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पारंपरिक कारागिरांच्या हाताला बळ देणारी आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल घडविणारी महत्त्वपूर्ण योजना आहे, असे प्रतिपादन आमदार श्याम खोडे यांनी केले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात टूलकिट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री राठोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवाजी कासारकर, डाक विभागाचे प्रतिनिधी श्री गुलाखी, आयटीआयचे प्राचार्य श्री लोणसुणे यांच्यासह विश्वकर्मा समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.


प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना टूलकिट, कर्जाची सुविधा, प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याला प्रोत्साहन मिळून कारागिरांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या विपणनासाठीही प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. या योजनेची जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन आमदार श्याम खोडे यांनी केले.


योजनेत विविध कौशल्यांचा समावेश असून, त्यातून पारंपरिक कारागिरांना बळ मिळत आहे. प्राप्त टूलकिटचा सुयोग्य वापर करून आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना टूलकिट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. टूलकिट प्राप्त झाल्याबद्दल कारागिरांनी आनंद व्यक्त केला.


#सेवासंकल्पअभियान #प्रधानमंत्रीविश्वकर्मायोजना #विश्वकर्मा #आत्मनिर्भरभारत #कारागीर #कौशल्यविकास #वाशिम

0 Response to "सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टूलकिटचे वितरण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article