भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वय रोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम इथे निवासी शिवणकाम महिला प्रशिक्षण संपन्न.....
साप्ताहिक सागर आदित्य
भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वय रोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम इथे निवासी शिवणकाम महिला प्रशिक्षण संपन्न..... भारतीय स्टेट बँक ग्रामीण प्रशिक्षण संस्था वाशिम येथे शिवणकाम महिला हे प्रशिक्षण 30 दिवसीय घेण्यात आले . या प्रशिक्षणामध्ये एकूण 35 महिला प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता.या प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज, युनिफॉर्म, पेटिकोट, आणि ड्रेस कसे शिवायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण देण्यात आले. यांची शेवटच्या दिवशी परीक्षा घेण्यात आली. बाह्य परीक्षक म्हणून ज्योती भारद्वाज मॅडम व ताजने सर होते.तसेच व्यवसाय कसा करावा किंवा स्वतःची व्यवसायाची तयारी कशी सुरु करावी.तसेच वनिता सुभाष साबळे मॅडम (व्याख्याता)SBI-RSETI Washim यांनी बँकिंग बद्दल तसेच उद्योजकीय सक्षमता कशा पद्धतीने व्यवसायिकांमध्ये असणे आवश्यक आहे.याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच उद्योजक आणि नोकर यामध्ये मुख्य फरक काय आहे. आणि उद्योजकाने उद्योगाकडे कसे वळले पाहिजे. याबद्दलचे सखोल मार्गदर्शन केले .तसेच ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक गणेश पठाडे सर यांनी प्रशिक्षणा दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधेबद्दलचे मार्गदर्शन केले . तसेच विमा बद्दल सुद्धा मार्गदर्शन केले .प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना तीन वेळेस चहा, एक वेळेस नाश्ता, आणि दोन वेळा जेवण देण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लागणारे सर्व साहित्य सुद्धा देण्यात आले. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले आहे.क्षेत्रभेट सुद्धा घेण्यात आली होती. प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा आणि तो लोन साठी किती उपयुक्त आहे, याबद्दलची सखोल मार्गदर्शन अधिव्याख्यात्या वनिता सुभाष साबळे मॅडम यांनी दिली आहे SBI RSETI Washim चे संचालक आदरणीय गणेश पठाडे सर यांनी असे आवाहन केले की वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वाशिम या ठिकाणी घेण्यात येतात जसे की मोबाईल रिपेरिंग , मशीन क्लास ,ब्युटी पार्लर ,वस्त्र चित्रकला , फोटोग्राफी , मोटर रिवायडींग अशा पद्धतीच्या प्रशिक्षणांना आपल्या आसपासचे जवळचे घरातले १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण भागातील गरजूवंत प्रशिक्षणार्थीना पाठवावेत असे आवाहन केले. संपर्क दूरध्वनी 90 22 85 45 52. या नंबर वर ग्रामीण भागातील गरजूवंत युवक युवतींनी लाभ घ्यावा. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय सहाय्यक योगेश चौव्हाण, तेजश्री निचडे मॅडम , सेवक महेंद्र सम्रत व महादेव भोयर यांनी सहकार्य केले.
0 Response to "भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वय रोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम इथे निवासी शिवणकाम महिला प्रशिक्षण संपन्न..... "
Post a Comment