भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये रुजवले जातात लोकशाहीचे धडे
साप्ताहिक सागर आदित्य
भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये रुजवले जातात लोकशाहीचे धडे
भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दि. 6 ऑगस्ट रोजी विद्यार्थीनी परिषदेची निवडणूक मोठ्या उत्साहात आणि लोकशाही पद्धतीने संपन्न झाली. शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थिनींमध्ये लोकशाही, शिस्त, सहिष्णुता आणि जबाबदारी या मूल्यांची रुजवणूक व्हावी या उद्देशाने ही निवडणूक घेण्यात आली.
यावर्षी शालेय विभागासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयासाठी वर्ग प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक झाली. एकूण 14 विद्यार्थिनींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये प्राथमिक विभागातील विद्यार्थिनी प्रशांत साळवे , अपूर्वा मोरे, श्रुती मानवतकर, भक्ती दराडे, पूर्वा मुंजे, समीक्षा मिरगे माध्यमिक विभागातून रीविका पंडित, आरती गव्हाणे, समृद्धी खडसे, अचल साळवे, जान्हवी गवळी तर ज्युनिअर विभागातून पायल शिंदे ,ज्ञानेश्वरी काळे ,प्रियंका ढोले अशा एकूण 14 उमेदवारांनी सहभाग घेतला होता.मागील 5 दिवसांपासून शाळा व महाविद्यालयात प्रचाराची चुरस, रणधुमाली पाहायला मिळाली. उमेदवारांनी आपले जाहीरनामे सादर करून शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात बदल घडवण्याचे आश्वासन दिले.
प्राचार्या सौ. मंजुषा सु. देशमुख मॅडम (निवडणूक निर्णय अधिकारी)यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षक आदरणीय सुनिल डहाळके सर(निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी), ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुधीर देशमुख सर (झोनल अधिकारी) तसेच माध्यमिक विभागातील निवडणूक विभाग प्रमुख सचिन महाजन सर, व उच्च माध्यमिक निवडणूक अधिकारी प्रा. अभिषेक टीकाईत सर यांच्या देखरेखीखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या 1100 विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी पारंपरिक मतपेटी व मतपत्रिकेचा वापर करण्यात आला. यामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा अनुभव मिळाला.
त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रमुख उपप्रमुखांना शपथ देण्यात आली. तसेच त्यांचे बॅच बिल्ला देऊन प्राचार्य आणि परिवर्तन यांच्या असते स्वागत करण्यात आले. त्यामध्ये प्राथमिक विभागातून वल कु. अपूर्वा अजय मोरे प्राथमिक विभाग प्रमुख ( विजेती). व कु. प्रशंसा दयानंद साळवे . प्राथमिक विभाग उपप्रमुख (उपविजेती)., माध्यमिक विभागातून कु.आचल दीपक साळवे माध्यमिक विभागप्रमुख.(विजेती), आरती मारोती गव्हाणे माध्यमिक उपमुख (उपविजेती),. व उच्च माध्यमिक विभागातून कु. ज्ञानेश्वरी शेषराव काळे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख(विजेती), प्रियंका श्रीधर ढोले उच्च माध्यमिक उपप्रमुख (उपविजेती). अशा ६ ही विजयी उमेदवारांचे प्राचार्या मंजुषा सु.मॅडम यांच्या हस्ते बॅच बिल्ला आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्राचार्या सौ. मंजुषा देशमुख मॅडम म्हणाल्या, "निवडणूक ही केवळ पद मिळवण्याची प्रक्रिया नसून ती लोकशाही जपण्याची शाळा आहे. येथून गेलेल्या विद्यार्थिनी उद्याच्या सक्षम नागरिक बनतील."
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दि. 6 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क प्रत्येक मुलींनी बजावला. व आनंद घेतला. खेळी मेळेच्या वातावरणात निवडणूक संपन्न झाली
0 Response to "भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये रुजवले जातात लोकशाहीचे धडे"
Post a Comment