स्वरकुंज चा गुरुवंदन सोहळा उत्साहात साजरा.
साप्ताहिक सागर आदित्य
स्वरकुंज चा गुरुवंदन सोहळा उत्साहात साजरा.
स्थानिक स्वरकुंज संगीत विद्यालय, प्रोफेसर कॉलनी, लाखाळा वाशिम. येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुवंदन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात स्वरकुंज लाखाळा वाशिम चे संचालक प्रा.सुमित खासभागे तसेच सहसंचालिका प्रा.मोहिनी सु.खासभागे विद्यार्थी प्रतिनिधी वैभव जवंजाळ यांच्या हस्ते गुरूंच्या प्रतिमेचे तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंप्रती असलेला आपला आदरभाव व्यक्त करण्यासाठी गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, कॅसिओ वादन, या माध्यमातून आपल्या अंगी असलेल्या कला गुरुचरणी सादर केल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला बघून मान्यवर पालक अक्षरशः भारावून गेले आणि त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन योगेश्वर अफुने, प्रणव राऊत, सुरज वाझुळकर, यांनी केले. कार्यक्रमांमध्ये तबला साथ संगत मयूर काळे, हर्षद वर्मा, यांनी केले. हार्मोनियम साथ संगत प्रा. मोहिनी खासभागे मॅडम यांनी केली. मंजिरी साथ संगत श्रेयस खंदारे यांनी केली. शेवटी मंजुश्री काळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्षवर्धन टेकाळे, पायल ठाकरे, अनुष्का खंदारे, वीर महात्मे,अनुज अग्रवाल, अधीराज इंगळे,करण अग्रवाल, सर्वेश वानखेडे, शंतनू खंदारे, आराध्य गोरे, कार्तिक खंडारे,रुद्र पाठक,कोमल नागुलकर,श्रावणी काळे,श्रुती गोरे,प्रतिमा शर्मा,डिंपल कुमावत,तन्वी वानखेडे, युवराज गडेकर,डीगांबर विटकरे यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "स्वरकुंज चा गुरुवंदन सोहळा उत्साहात साजरा."
Post a Comment