-->

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात  साजरा....

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा....



 साप्ताहिक सागर आदित्य 

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात  साजरा.... 

               

  रिसोड तालुक्यातील एकमेव नाविन्यपूर्ण उपक्रम राबणारी भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 195 वी जयंती एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करत असताना महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम, व सन्माननीय पर्यवेक्षक सुनील डहाळके सर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाच्या अध्यक्ष  कु.सिद्धी तायडे, व प्रमुख अतिथी कु. किरण कैलास पवार, कु. लक्ष्मी गवळी , सेजल तिडके या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते बारावी च्या हजारो विद्यार्थिनींच्या  उपस्थितीत कार्यक्रम साजरा करत असताना विद्यार्थिनीनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत प्रथमतः उत्कृष्ट लघु नाटिका सादर करत श्रोत्यांना अंतर्मुख करत तसेच प्रबोधनात्मक  गीतांच्या माध्यमातून  मंत्रमुग्ध केले, एक वैचारिक जयंती साजरी करताना सावित्रीमाईच्या संघर्षमय जीवनगाथा आपल्या प्रखड विचारातून कथन  करताना जयंतीदिनी समस्त भारतीय स्त्रियांनी आपल्या सावित्रीबाईंचा वारसा लाभलेला आहे. त्यातून आपण आपला नसून, सबला झाल्या आहोत. याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांनी केलेल्या कार्याच्या प्रेरणेतून आपणही इतर स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांच्या पंखात बळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सम्यक संकल्प करूया तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या कार्य अन विचारांना जागृत ठेवून त्यांच्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी अभिवादन करू असे आपल्या भाषणातून प्रखर विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कु.किरण कैलास पवार हिने सावित्रीमाईंच्या  संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकतात ज्यांच्यामुळे आज महिला ताठ मानेने राहत आहे, अनेक क्षेत्रात आपल्या प्रतिभा आणि प्रतिमेचा ठसा उमटत आहेत. ही केवळ सावित्रीबाईंची देन आहे असे आपले प्रकट विचार व्यक्त केले. दुसऱ्या प्रमुख अतिथी कु. लक्ष्मी गवळी व कु.सेजल तिडके यांनी आपल्या विचार व्यक्त करताना स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा नव्हे तर दोन पावले पुढे आहे, परंतु या मागच्या प्रेरणा कोण आहेत हे कधी माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न आपल्या या वैचारिक भाषणातून प्रेक्षकांना केला. त्यानंतर प्रमुख अध्यक्ष  कु. सिद्धी तायडे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनाची गाथा सांगत असताना सती प्रथा केशव पण अशा प्रथा बंद करत सन 1853 झाली बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले व सावित्रीमाईंनी ते समर्थपणे चालविले. प्रमुख अतिथी आदरणीय पर्यवेक्षक सुनील डाहाळके सर यांनी  सावित्रीमाई फुले यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1955 सालापासून 3 जानेवारी हा सावित्रीमाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. व सर्व बालिकेंनी शेवटी सावित्रीमाईंच्या जन्मदिनी मंगलमय शुभेच्छा दिल्या. शेवटी आपल्या प्रमुख मार्गदर्शनाने भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम यांनी सावित्रीमाईच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकताना ज्या सावित्रीमाईनी स्त्री शिक्षणाचा पाया 1 जानेवारी 1848 भिडे वाड्यात पहिली शाळा काढून घातला. त्या सावित्रीमाईंचा आज मात्र संपूर्ण महिला वर्गाला विसर पडला आहे. अलीकडे काही जण सरस्वती ही विद्येची देवता नसून सावित्रीमाईच विद्येची देवता आहे, असे म्हणत आहेत परंतु त्यांना देवता म्हणणे हा त्यांचा अवमान आहे. आज पर्यंत कोणताही देव किंवा देवता स्त्री शुद्राच्या मदतीला धावून आली नाही. मग त्यांनी शिक्षण देणे तर दूरच म्हणूनच त्या देवता नसून, क्रांतीज्योती आहेत. असे प्रखर मत आपल्या वैचारिक भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैशाली खोडके व प्रीती गिरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. लक्ष्मी खंडागळे  हिने केले.

0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा.... "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article