भारत प्राथमिक मराठी शाळेत महिला पालकांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळेत महिला पालकांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन
रिसोड:येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत, महिला पालकांचा शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पालकांसाठी मनोरंजक खेळांच्या स्पर्धांचे 2 जानेवारी रोजी विशेष आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांच्या हस्ते महिला पालकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संगीत खुर्ची , फुगा फोड, पाणी बॉटल भरणे आदी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये महिला पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमात रंगत आणली.
खेळांच्या माध्यमातून महिला पालकांमध्ये उत्साह, आनंद व परस्पर संवादाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सहभागी सर्व महिला पालकांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापिका किरणताई दुबे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांच्या संकल्पनेतून सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जोपासणी करणारे विविध उपक्रमा शाळेत आयोजित करण्यात येतात.अशा उपक्रमांमुळे शाळा व पालक यांच्यातील विश्वास आणि सहकार्य वाढते.”
उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.या उपक्रमामुळे शाळा व पालक यांच्यातील सामन्वय , सहकार्य व आपुलकी अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता ज्येष्ठ शिक्षिका जयश्री दुबे , पूजा लोंढे,शिक्षक धनंजय वाघ ,गौरव पतंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळेत महिला पालकांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन"
Post a Comment