हातात सेवा, हृदयात माणुसकी; सुनील पाटील लहाने
साप्ताहिक सागर आदित्य
हातात सेवा, हृदयात माणुसकी; सुनील पाटील लहाने
दरवर्षीप्रमाणे यावर्षी वाघळूद ते शेगाव दिंडी मालेगाव येथे असताना सर्व वारकऱ्यांना सकाळी फराळ पाणी करून आरती घेतली सोबत आमचे जनक्रांती संघटनेचे पदाधिकारी व सहकारी कृष्णा भाऊ गायकवाड प्रदीप नागे पाटील सतीश भाऊ देशमुख नंदू भाऊ विडोळे सर्वांनी आरती करून दर्शन घेतले
समाजकार्य ही शब्दांचीत नाही, तर कृतीची भाषा आहे. आज समाजात बदलाच्या अनेक चर्चा ऐकू येतात; पण प्रत्यक्ष कृती करणारी माणसं मोजकीच. मोठ्या घोषणा करता येतात, मोठे मंच सजवता येतात, परंतु संकटात धावून जाणारी पावलं फारच थोड्यांकडे असतात. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील सुनील पाटील लहाने माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं नाव घेतलं की माणुसकीच्या प्रत्यक्ष, जिवंत आणि निस्पृह कार्याचा एक शांत प्रकाश समोर येतो. करंजी सारख्या ग्रामीण भागातून उभं राहून त्यांनी जे कार्य उभारलं आहे, ते समाजातील संवेदनशीलतेचं उत्तम प्रतीक आहे. आजच्या काळातील समाजकार्य बहुतेकदा प्रसिद्धीच्या आणि राजकारणाच्या कक्षा ओलांडत नाही; पण सुनील पाटील लहाने यांची कामं या साच्यात मावत नाहीत. त्यांच्याकडे न घोषणाबाजी, न प्रसिध्दीचा गाजावाजा फक्त माणूस आणि माणुसकी. त्यामुळेच ते जिल्हा परिषद सर्कल असंख्या लोकांसाठी ‘पहिला हात’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन ठळक पैलू अधोरेखित करावे लागतील. पहिला म्हणजे संकटात तत्पर धाव घेणारी वृत्ती.
नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक संवाद यामुळे त्यांनी असंख्य तरुणांची पकड सुटलेली वाट परत जोडली आहे. “स्वप्न मोठे बाळगा, पण पाय जमिनीवर ठेवा आणि मनात त्यापैकीच एक. ते केवळ समाजसेवक नाहीत; ते गरजूंच्या अंतःकरणात उजेड पाडणारा दीप आहेत.
0 Response to "हातात सेवा, हृदयात माणुसकी; सुनील पाटील लहाने "
Post a Comment