-->

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस उत्साहात साजरा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस उत्साहात साजरा



 साप्ताहिक सागर आदित्य 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस उत्साहात साजरा 

नारायणा प्री प्रायमरी स्कूल मध्ये  3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वर्ग नर्सरी ते यू के जी च्या  विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले वेशभूषा परिधान करून  त्यांचा ज्ञानाचा संदेश विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून दिला. या मागचा उद्देश हा की विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार हा समान मिळाला पाहिजे व  शिक्षणाचा वारसा हा असाच जन्म चालला पाहिजे. व त्यांनी केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य आपल्या समाजातील प्रत्येक स्त्री व प्रत्येक मुलगी  मशिक्षणापासून वंचित न राहता तिला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे हा होता. शाळेचे अध्यक्ष अनिल धुमकेकर सर व आरती धुमकेकर मॅडम आणि अतुल धुमकेकर सर उपस्थित होते. व नारायणा किड्स च्या मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच नारायणा सेकंडरी हायर सेकंडरीच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी सराटे मॅडम, एम. एम . एस .ई प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका धुमकेकर या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.वर्ग नर्सरी ते युकेजी वर्गाच्या शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


0 Response to " क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस उत्साहात साजरा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article