मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वाशिम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बार या नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी उत्पादनांचे
साप्ताहिक सागर आदित्य
मकरसंक्रांतीला पौष्टिकतेची नवी ओळख
वाशिम शेतीशिल्प चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बारचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
वाशिम, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वाशिम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बार या नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी उत्पादनांचे ५ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हॉटेल दानीश एम्पायर येथे शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी प्रकल्प संचालक (आत्मा) अनीसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, कृषी उपसंचालक हिना शेख,उद्योग सहसंचालक (अमरावती) निलेश निकम, तसेच जिल्हा उद्योग केंद्र वाशिमच्या महाव्यवस्थापक पूनम घुले,सीएम फेलो संकेत नरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मकर संक्रांतीच्या पारंपरिक तीळ-गूळ खाण्याच्या प्रथेला आधुनिक पोषणमूल्यांची जोड देत, चिया बियाण्यांचा समावेश करून हे पदार्थ विकसित करण्यात आले आहेत. चिया बिया ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर व प्रथिनांनी समृद्ध असल्याने हे पदार्थ आरोग्यदायी ठरत असून, परंपरा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम या माध्यमातून साधण्यात आला आहे.
आत्मा अंतर्गत बॅंगलोर येथे चिया न्यूट्री बार निर्मितीचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. त्या प्रशिक्षणाच्या आधारे शेतकरी व महिला बचत गटांनी चिया तिळगूळ, चिक्की व न्यूट्री बारची निर्मिती केली असून, यामुळे ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी ‘चिया तिळगूळ महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात चिया आधारित विविध पदार्थांची माहिती, चाखण्याची संधी व विक्रीची व्यवस्था असणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१८५२३७००४
0 Response to "मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वाशिम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बार या नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी उत्पादनांचे"
Post a Comment