-->

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषदेच्या क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ.

खेळातून ताणमुक्ती, संघभावना वृद्धिंगत: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आला.

त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आकाश वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, मुख्या लेखा वित्त अधिकारी योगेश क्षीरसागर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, शिक्षण अधिकारी संजय ससाने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. 

उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, “अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांची परंपरा जुनी असली, तरी जिल्हा परिषदेच्या स्पर्धांमध्ये नेहमीच विशेष चुरस पाहायला मिळते. क्रीडा स्पर्धांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही तितकेच रंगतदार असतात. मोठ्या आस्थापनामुळे येथे अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग व्यापक असतो. या स्पर्धांच्या निमित्ताने कामाच्या ताण-तणावातून सुटका होते आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील सांघिक भावना अधिक दृढ होते.”

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने आयुष्यात किमान एका तरी खेळाची जोपासना करावी. खेळ माणसाला ताण-तणावापासून दूर ठेवतात आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे काम करतात.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा स्पर्धेचे सचिव तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांनी केले. ते म्हणाले, “या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडूवृत्ती वाढावी, परस्परांतील अंतर काही काळापुरते का होईना कमी व्हावे आणि सर्वजण एका पातळीवर येऊन आनंदाने सहभागी व्हावेत, हाच या स्पर्धांचा उद्देश आहे. त्यामुळे या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील, अशी अपेक्षा आहे.”

कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव आणि आदर्श शिक्षक डिगांबर घोडके यांनी केले.

क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. 

--------

उद्घाटन कार्यक्रम दरम्यान विविध संघाने विविध विषय घेऊन झाकी  सादर केली होती. या झाकीने (सादरीकरणाने) सर्वांचे लक्ष वेधले होते.


कारंजा पंचायत समितीने "पहलगाम येथील पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला" या विषयावर देखावा सादर केला.

मुख्यालयाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य तसेच शंभुराजे यांच्या शौर्यावर देखावा सादर केला. 

मालेगाव पंचायत समितीने आपल्या देखाव्याच्या माध्यमातून सिकल सेल या आजाराबाबत जनजागृती केली. 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे महत्व अधोरेखित करून याच थीमवर रिसोड पंचायत समितीने देखावा सादर केला.

मानोरा पंचायत समितीने आपल्या देखाव्याच्या माध्यमातून पवरादेवी तीर्थक्षेत्र आणि मातृसत्ताक परंपरा व बंजारा संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे दृश्य सादर केले. 

वाशिम पंचायत समितीने आपल्या सादरीकरणातून भारताच्या सीमेवर कर्तव्यावर शहीद झालेले जवान अमोल गोरे यांना श्रद्धांजली वाहिली.

मंगरूळपीर पंचायत समितीच्या वतीने मात्र यावेळी कोणतेही सादरीकरण करण्यात आले नाही.

0 Response to "जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article