कडाक्याच्या गार थंडीत भा.मा. कन्या शाळेच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी घेतला सहलीचा मनमुराद आनंद...
साप्ताहिक सागर आदित्य
कडाक्याच्या गार थंडीत भा.मा. कन्या शाळेच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी घेतला सहलीचा मनमुराद आनंद...
रिसोड तालुक्यातील सदैव वेगवेगळ्या अग्रेसर असलेली आणि एकमेव मुलींची भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथील एक अभ्यासक्रम भाग म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन केले असता प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या जवळपास 160 विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. महामंडळा कडून नवीन छान लालपरी चार एस टी बस त्यासाठी देण्यात आल्या. ही शैक्षणिक सहल एक नाविन्यपूर्ण ठिकाणी नेण्यात आली त्यामध्ये- रिसोड -राजनगाव- थेऊर -सिंहगड किल्ला-वाई -मांढरदेवी- जेजुरी- प्रतिबालाजी - पाचगणी -महाबळेश्वर-बामनोली व परत रिसोड असा हा चार दिवसाचा गार कडाक्याच्या थंडीत मुलींनी सहलीचा मनमुरादपणे आनंद घेत शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक,सांस्कृतिक, निसर्गरम्य अशा बहुविध आगळ्यावेगळ्या ठिकाणाला भेटी देत मनसोक्त आनंद घेतला. या सहली दरम्यान (प्रवासात) विद्यार्थिनींनी मौज मजा करत मराठी हिंदी जुन्या नव्या गाण्यांच्या भेंड्या, प्रश्नमंजुषा, डान्स, विनोद, वेगवेगळ्या खेळाचा आनंद घेत आपला प्रवास सुखकर व आनंददायी केला. रात्री कॉलेजच्या प्रांगणातून कडाक्याच्या थंडीत रिसोड वरून सहलीचा प्रारंभ करून सकाळी रांजणगावला स्वयंभू महागणपतीचे दर्शन घेऊन पुढे थेऊर कडे सहल रवाना झाली. थेरूरला पोचल्यावर चिंतामणी गणपतीचे दर्शन घेत सहल पुढे सिंहगडाकडे सहल रवाना झाली तेथे पोचल्यावर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेत. सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व मुलींना समजावत पुढे सहल वेळ वाकड्या वळणाच्या रस्त्याने मांढरदेवी कडे निघाली तेथे पोचल्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर जिथे तीन नद्यांचा संगम आहे अशा रुद्राक्ष रुपी महादेवाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो दर्शन घेत. पुढे वाई येथे गणपतीचे दर्शन घेऊन वाई वरून दुसऱ्या दिवशी पाचगणी कडे निघालो पाचगणी हे जमिनीपासून उंच4000 फूट असलेले थंड हवेचे आणि स्ट्रॉबेरी साठी असलेले ठिकाण. येथे मुलींनी मनमुरांतपणे निसर्गाचा आनंद लुटत घोडेस्वारी व उत्तम फोटोसेशन केले . तिथून पुढे दुसरे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर येथे अनेक चित्रपटाच्या शूटिंग झाल्या व पाच नद्यांचा संगम असलेले हे जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण मुलींनी बघितले. महाबळेश्वर आटोपून पुढे निसर्गरम्य असलेले डोंगरात वसलेलं आणि होडीने जावं लागणार ठिकाण म्हणजे बामनोली एक अद्भुत नयनरम्य असे हे ठिकाण येथे मुक्कामासाठी गेले व तिथे मुलींनी सुंदर छान शेकोटीच्या तालावर नृत्य करत येथेछ लय लूट केली. शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा वेगवेगळ्या कला सादर करत या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. येथे सरपंचाचा वाडा, शेकोट्या, टेंथ आणि बोटीचा प्रवास एक अद्वितीय. शेवटी प्रतिचा प्रवास सुरू झाला असता. परतताना प्रति बालाजी. तेथून जेजुरी आणि जेजुरी वरून परत सुखरूप सहल रीसोडला पोहचली. या सहलीमध्ये एकंदरीत शिस्त ही वाखरन्या जोगी होती. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात व्हायची. जेवणाची व राहण्याची उत्तम सोय असायची. पालकांनी सुद्धा या सहलीचे भरभरून कौतुक केले. यामध्ये प्राचार्या. मंजुषा सु. देशमुख मॅडम, पर्यवेक्षक सुनील डाहाळके सर, आणि सहल प्रमुख ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुधीर देशमुख सर या सर्वांच्या मार्गदर्शनाने सहल सुखरूप पार पडली. यानंतर सहलीचा दुसरा टप्पा वेदनंदिनी आणि विदर्भाची पंढरी असलेले शेगाव या ठिकाणी एकदिवसीय सहलीचे आयोजन केले असता यामध्ये उर्वरित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला व वेदनंदिनी येथे मनमुरादपणे आनंद लुटत श्री गजानन महाराज शेगाव यांच्या दर्शनाने यावर्षी च्या सहलीची सांगता करण्यात आली. या सहलीसाठी प्राचार्या पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी आणि विशेष करून लाल परी व स्कूल बस यांचे चालक यांनी परिश्रम घेतले. या शिस्तबद्ध सहलीचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.
0 Response to "कडाक्याच्या गार थंडीत भा.मा. कन्या शाळेच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी घेतला सहलीचा मनमुराद आनंद... "
Post a Comment