-->

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेवर एलपीजी सेवा   पुरवावी      जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेवर एलपीजी सेवा पुरवावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर



साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेवर एलपीजी सेवा 

पुरवावी

    जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 


एलपीजी वितरण व्यवस्थेला दिरंगाई होऊ नयेत; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उज्ज्वला समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्देश 


वाशिम  

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेवर एलपीजी सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. गॅस वितरण व्यवस्थेत कोणतीही त्रुटी, अनियमितता किंवा तक्रार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. शासनाच्या सर्व सूचनांचे पूर्ण पालन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधावा. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.


जिल्ह्यातील एलपीजी जोडणी, वितरण आणि तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण जिल्हा उज्ज्वला समिती बैठक संपन्न झाली.


या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, बीपीसीएलचे नोडल अधिकारी क्रिष्नकुमार, एचपीसीएलचे प्रतिनिधी अथर्व पानसरे, आयओसिएलचे प्रतिनिधी सन्मान शहारे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील गॅस पुरवठा प्रणाली अधिक दर्जेदार आणि सुरक्षित करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.


बैठकीत जिल्ह्यातील सर्व एलपीजी जोडण्यांची भौतिक पडताळणी नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत, बोगस किंवा दुप्पट कनेक्शन ओळखून त्यावर कारवाई करण्याचे ठरले. पडताळणी पथकांनी अधिक काटेकोर आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यावर भर देण्यात आला.


ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

सिलेंडर वितरणातील विलंब, ओव्हररेटिंग, वजनातील तफावत अशा तक्रारी तत्काळ निकाली काढण्यासाठी एजन्सींना कडक सूचना देण्यात आल्या.


एलपीजी वितरण करताना वाहतूक वाहनांची तपासणी, सिलेंडर हाताळणी, कर्मचार्‍यांचे सुरक्षा प्रशिक्षण, अग्निशमन साधनांची उपलब्धता अशा मुद्द्यांवर चर्चा होऊन सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला.

अपघात टाळण्यासाठी एजन्सींनी नियमितपणे सुरक्षा तपासणी करावी, असा निर्देश करण्यात आला.


 ग्राहक सुविधा अधिक प्रभावी करण्यावर भर


• एसएमएस / मोबाईल अ‍ॅपद्वारे बुकिंग व वितरण माहिती

• डिजिटल पेमेंट सुविधा

• वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सेवा

• सुरक्षा मार्गदर्शन मोहीम


या सुविधा सर्वत्र प्रभावीतेने राबविण्याचे निर्देश देण्यात आले.


 बोगस कनेक्शनविरोधात विशेष मोहीम


अनधिकृत स्टोव्ह विक्री, व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅसचा गैरवापर, अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावावर घेतलेले कनेक्शन यावर विशेष मोहीम राबवून तपास करण्याचे ठरविण्यात आले.


एजन्सींचे कामकाज पारदर्शक करण्याचे आदेश


एलपीजी एजन्सींनी वितरण नोंदी, ग्राहक यादी, स्टॉक तपशील अद्यावत ठेवणे अनिवार्य करण्यात आले. एजन्सीकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.


बैठक उत्साहपूर्ण आणि चर्चाप्रधान वातावरणात संपन्न झाली. एलपीजी जोडणी व वितरण व्यवस्थेतील सुधारणा, तक्रार निवारण यंत्रणा आणि सुरक्षा मानकांचे बळकटीकरण यासंबंधी घेतलेल्या निर्णयांचा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

0 Response to "जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेवर एलपीजी सेवा पुरवावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article