-->

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंमलबजावणीविषयी महत्त्वपूर्ण आढावा बैठक

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंमलबजावणीविषयी महत्त्वपूर्ण आढावा बैठक



 साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्यात आरोग्य सेवांचा वेग व दर्जा वाढवावा

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 

विस्तारित आयुष्मान भारत व महात्मा फुले योजना आढावा बैठक


वाशिम,  जिल्ह्यातील एकाही पात्र लाभार्थ्याला उपचारांपासून वंचित राहू दिले जाणार नाही. रुग्णालयांनी सेवा गुणवत्तेचा उच्च दर्जा राखत वेळेत उपचार प्रदान करणे अनिवार्य आहे. यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक बळकट करण्याचेही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देश दिले.


जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा अधिक प्रभावीपणे आणि निर्विघ्नरित्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंमलबजावणीविषयी महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. 


बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.पंकज बोरकर, योजना समन्वयक , तसेच सहभागी रुग्णालयांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.


बैठकीत दोन्ही योजनांच्या अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या मोफत आणि रोखरहित उपचारांची सद्यस्थिती, शासकीय व खासगी रुग्णालयांची कार्यक्षमता, लाभार्थ्यांची नोंदणी, कार्ड वितरण, उपचारांची संख्या तसेच प्रलंबित प्रकरणे यावर सखोल चर्चा झाली.


जिल्ह्यातील सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत योजनांचा परिणामकारक लाभ पोहोचावा यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.


समारोपात जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे वाशिम जिल्हा आरोग्यसेवेतील आदर्श जिल्हा म्हणून पुढे यावा ही अपेक्षा व्यक्त केली. तसेच सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुध्दा या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी  यावेळी केले.

0 Response to "आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंमलबजावणीविषयी महत्त्वपूर्ण आढावा बैठक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article