-->

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी  हजारो विद्यार्थिनींनी केले अभिवादन....

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी हजारो विद्यार्थिनींनी केले अभिवादन....

 


साप्ताहिक सागर आदित्य 

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी  हजारो विद्यार्थिनींनी केले अभिवादन....

 रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींची भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न बोधिसत्व प्रज्ञा सूर्य महामानव विश्ववंदनीय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनी कन्या शाळेतील हजारो विद्यार्थिनींनी केले विनम्र अभिवादन. प्रथमतः महाविद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय मंजुषा सु.देशमुख मॅडम, आदरणीय पर्यवेक्षक सुनील डहाळके सर,प्रमुख अतिथी मार्गदर्शक प्रा. गुलाब साबळे सर प्रा. पांडुरंग मोरे सर, प्राध्यापिका वृषाली देशमुख मॅडम या सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानव विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिप-धुपाणे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.साधना बोरकर मॅडम यांनी केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी सुमधुर गीत पोवाडे आणि कविता व उत्कृष्ट भाषणे सादर केली.विद्यार्थिनींनी एक आगळ्यावेगळ्या प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. तसेच श्रीमती बेलकुंदे मॅडम यांनी लाल दिव्याच्या गाडीला... या सुमधुर गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्राध्यापिका वृषाली देशमुख मॅडम यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना बाबासाहेब यांनी सामाजिक शांतता दूर करू समता प्रस्थापित कशी केली याविषयी आपले मत व्यक्त केले.प्रा.पांडुरंग मोरे सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही म्हणजे आपणाला मिळालेली एक नव संजीवनी आहे असे मत व्यक्त केले. तसेच प्रा.गुलाब साबळे सर यांनी बाबासाहेबाला अभिवादन करत त्यांच्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक संस्कृतीक आर्थिक राजकीय कायदेविषयक चौफेर प्रकाश टाकत अथांग ज्ञानाच्या महासागरास आज जगभरातुन आदरांजली वाहिली जाते तसेच प्रत्येकाने बाबासाहेबांच्या विचाराचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले.  पर्यवेक्षक सुनील डाहाळके सर यांनी बाबासाहेबांना अभिनंदन करत असताना बाबासाहेब कसे थोर समाज सुधारक, आर्थिक धोरणांचे  धुरीण, शोषितांचे व बहुजनांचे कैवारी, आंतरराष्ट्रीय संबंधाचे सबंधाचे जाणकार व भाष्यकार, सांप्रदायिक सद्भावना व  सहिष्णुता प्रेरक आणि अंधश्रद्धेचे विरोधक कसे होते अशा विविध पैलू वर आपल्या वैचारिक भाषणातून प्रकाश टाकला. शेवटी या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या   प्राचार्या मंजुषा सु देशमुख मॅडम यांनी बाबासाहेबांना अभिवादन पर मनोगत व्यक्त करतात बाबासाहेब कसे स्त्री उद्धारक होते, महिलांच्या समान हक्कासाठी संघर्षरत, प्रखर देशभक्त, झुंजार पत्रकार व संपादक  आणि लेखक, शांतता प्रेमी , प्रभावी वक्ते, खरे  लोकशाहीवादी , कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये, प्रखर विज्ञानानिष्ठ, शिक्षणाचे प्रेरणास्तंभ, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागरूक, ज्ञानपुरुष व समता प्रेमी, नीसिंम ग्रंथ प्रेमी, विचार स्वातंत्र्याचे खंदे   पुरस्कर्ते, कायदे पंडित प्रज्ञा सूर्य, क्रांतीसुर्य ज्ञानाच्या अथांग महासागरास अशी वैचारिक श्रद्धांजली वाहिली, व विद्यार्थिनींनी बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा शेवटी असा सूचक सल्ला दिला. या अभिवादन व आदरांजली च्या  कार्यक्रमासाठी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या हजारो विद्यार्थीनी उपस्थित होत्या. तसेच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु.किरण कैलास पवार हिने केले व आभार प्रदर्शन कु. जान्हवी कांबळे हिने केले.

0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी हजारो विद्यार्थिनींनी केले अभिवादन...."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article