-->

जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती उपक्रम उत्साहात

जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती उपक्रम उत्साहात



साप्ताहिक सागर आदित्य 

 जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती उपक्रम उत्साहात 


वाशिम, दि. ११ डिसेंबर  मानवी हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वाशिम जिल्हा कारागृहात बंदी बांधवांसाठी मानवी हक्क जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


हा कार्यक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, तसेच कारागृह उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्ही. जी. चौखंडे, अधीक्षक वाशिम जिल्हा कारागृह जी. के. सरोदे, अध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ अॅड. अनुप बाकलीवाल, उपाध्यक्ष वकिल संघ अॅड. वैभव तिफणे तसेच अॅड. पी. के. सावरकर उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान बंदी बांधवांना मानवी हक्क, कर्तव्य, कायदेशीर संरक्षण, न्याय सहाय्य आणि पुनर्वसन प्रक्रियेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, सचिव व्ही. जी. चौखंडे आणि अॅड. पी. के. सावरकर यांनी बंद्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांविषयी तसेच समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यन्यायरक्षक परमेश्वर आ. शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अधीक्षक जी. के. सरोदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अमृत ल. आगाशे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) राजेंद्र एन. राठोड तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम बंदी बांधवांमध्ये कायदेशीर जागरूकता, मानवी मूल्यांची जाणीव आणि पुनर्वसन प्रक्रियेला चालना देणारा ठरला.

0 Response to "जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती उपक्रम उत्साहात "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article