-->

मतदान प्रक्रियेच्या तयारीचा आढावा;   रिसोडमध्ये द्वितीय प्रशिक्षणात जिल्हाधिकार्‍यांचा थेट संवाद

मतदान प्रक्रियेच्या तयारीचा आढावा; रिसोडमध्ये द्वितीय प्रशिक्षणात जिल्हाधिकार्‍यांचा थेट संवाद



साप्ताहिक सागर आदित्य 

मतदान प्रक्रियेच्या तयारीचा आढावा; 

रिसोडमध्ये द्वितीय प्रशिक्षणात जिल्हाधिकार्‍यांचा थेट संवाद


वाशिम,   नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची काउंटडाउन सुरू असताना निवडणूक यंत्रणेची अचूकता आणि सज्जता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. त्याच अनुषंगाने  दि.२४ नोव्हेंबर रोजी भारत माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकार्‍यांसाठी द्वितीय प्रशिक्षण सत्र पार पडले. 


या प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः उपस्थित राहून तयारीचा प्रात्यक्षिक आढावा घेतला. मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या शंका निरसन केल्या, तसेच जबाबदारीच्या प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शनही केले.


जिल्हाधिकार्‍यांनी अधिकारीवर्गाला उद्देशून सांगितले, मतदारांचा विश्वास ही निवडणूक व्यवस्थेची मूळ ताकद आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मतदान केंद्रावरील प्रत्येक कृती नियमाधारित, पारदर्शक आणि अत्यंत अचूक असली पाहिजे.


प्रशिक्षणात ईव्हीएम  मशीनची सविस्तर कार्यप्रणाली, त्यातील बटन चाचणी, मॉक पोल, सीलिंग प्रक्रिया, तसेच मतमोजणीपूर्व सुरक्षा प्रोटोकॉल यांची सखोल माहिती देण्यात आली. याशिवाय मतदान केंद्रावरील मतदार व्यवस्थापन, दिव्यांग मतदारांना सहाय्य, मतदान  दर वाढीसाठी सकारात्मक दृष्टीकोन तसेच अनपेक्षित परिस्थिती हाताळण्याच्या उपाययोजनांवरही विशेष भर असायला हवा.असे त्यांनी यावेळी सांगितले.


पहिल्या प्रशिक्षणापेक्षा या सत्रात अधिक प्रत्यक्ष सराव आणि चुका दुरुस्तीवर विशेष लक्ष केंद्रित केले गेल्याचे तहसीलदार श्रीमती तेजनकर यांनी सांगितले.

 पोलिंग पार्टीच्या प्रस्थान, वाहतूक, सुरक्षा दस्तऐवज, तसेच आवश्यक साहित्याच्या हाताळणीसंदर्भातही मार्गदर्शन देण्यात आले.


प्रशिक्षणादरम्यान तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील तयारीचा आढावा सादर करत ३५ मतदान पथके, ४ राखीव पथके, एकूण ३९ पथके तसेच ३५ मतदान केंद्रे कार्यरत राहणार असल्याची माहिती दिली. तसेच मतदारसंख्येचा तपशील देताना १४ हजार ६८३ स्त्री मतदार, १५ हजार २७९ पुरुष मतदार मिळून एकूण २९ हजार ९६५ मतदार असल्याचे सांगितले.


प्रशिक्षणात मतदान केंद्र व्यवस्थापन, शिस्तपालन, मतदान प्रक्रियेची अचूकता आणि मतदार सुविधांबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.


या प्रशिक्षण सत्राला निवडणूक शाखेचे अधिकारी, मास्टर ट्रेनर्स, पोलिस प्रतिनिधी तसेच सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रशिक्षणामुळे रिसोड तालुक्यातील मतदान कर्मचारी आगामी निवडणुकीसाठी अधिक आत्मविश्वासाने सज्ज झाल्याचे चित्र दिसून आले.प्रशिक्षणासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश शेवदा,तालुका कृषि अधिकारी श्री. तावरे, मंडळ अधिकारी सुनील लोखंडे, मंडळ अधिकारी उत्तम नप्ते, महसूल सहाय्यक गजानन देशमुख, ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील धांडे, ग्राम महसूल अधिकारी धनंजय काष्टे आदींनी पुढाकार घेतला.

0 Response to "मतदान प्रक्रियेच्या तयारीचा आढावा; रिसोडमध्ये द्वितीय प्रशिक्षणात जिल्हाधिकार्‍यांचा थेट संवाद"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article