-->

आधार नोंदणी व अपडेट सेवांसाठी सुधारित दर जाहीर

आधार नोंदणी व अपडेट सेवांसाठी सुधारित दर जाहीर



साप्ताहिक सागर आदित्य 

 आधार नोंदणी व अपडेट सेवांसाठी सुधारित दर जाहीर


वाशिम ,दि.१ ऑक्टोबर  भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.१ ऑक्टोबर २०२५ पासून दि.३० सप्टेंबर २०२८ या कालावधीत आधार नोंदणी व अपडेट सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.


सेवा व सुधारित दर (GST सह) :

१. नवीन आधार नोंदणी – मोफत

२. अनिवार्य वायोमेट्रिक अपडेट (५ ते १७ वर्षे वयोगट) – मोफत

३. इतर बायोमेट्रिक अपडेट (डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय) – ₹१२५

४. डेमोग्राफिक अपडेट (एक किंवा अधिक क्षेत्र) – आधार केंद्रामध्ये किंवा ऑनलाइन – ₹७५

५. पत्याचा पुरावा / ओळखीचा पुरावा / दस्तऐवज अद्यावत – आधार नोंदणी केंद्रामध्ये – ₹७५

६. पत्याचा पुरावा / ओळखीचा पुरावा / दस्तऐवज अद्यावत – SSUP (myAadhaar पोर्टल) द्वारे – ₹७५

७. ई-केवायसी / आधार शोध / इतर साधनाद्वारे आधार शोध व A4 आकार रंगीत प्रिंट – ₹४०


आधार केंद्र चालकांसाठी बंधनकारक सूचना: 

सुधारित दरांचे फलक आधार केंद्रावर दर्शनी भागावर स्पष्टपणे लावावेत.

१ ऑक्टोबर २०२५ पासून फक्त सुधारित दरानुसारच शुल्क आकारले जावे.

नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास कठोर कारवाई होणार.

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन बंधनकारक.


तक्रार नोंदविण्याची सुविधा :


नागरिकांनी आधार केंद्र चालकाविरुद्ध तक्रार असल्यास संबंधित तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार शाखा येथे तक्रार दाखल करावी किंवा UIDAI च्या टोल-फ्री क्रमांक १९४७ वर संपर्क साधावा.

0 Response to "आधार नोंदणी व अपडेट सेवांसाठी सुधारित दर जाहीर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article