
भा. मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजेता...
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भा. मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजेता...
भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोडच्या विद्यार्थिनी नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये अग्रगण्य असतात. त्यातीलच एक भाग म्हणून दिनांक 29 सप्टेंबर रोजी कारंजा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल अंडर 19 स्पर्धेमध्ये भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी दैदीप्यमान यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामध्ये शुभांगी वाळके, गौरी जाधव, श्रावणी पौळ, हर्षदा भोपाळे, मनीषा कांबळे, वैशाली ढोले, भाग्यलक्ष्मी भांदुर्गे, देविका जोशी, आकांक्षा घुगे, लक्ष्मी खंडागळे, साक्षी राजूरकर, गौरी नाईकवाडे, खुशी खडसे व लक्ष्मी खंडागळे या विद्यार्थिनीनी उत्कृष्ट हॉलीबॉल या खेळाचे प्रदर्शन करत. विजेत्या ठरल्या आहेत . त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक सुधीर देशमुख सर यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले. या सर्व विजयी विद्यार्थिनी स्पर्धक खेळाडूचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सुधीर देशमुख सर यांचे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम, पर्यवेक्षक सुनील डहाळके सर, सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांचे स्वागत व भरभरून कौतुक केले. आणि पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांना अनंत शुभेच्छा दिल्या.
0 Response to "भा. मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजेता... "
Post a Comment