
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय कबड्डी मध्ये दैदीप्यमान यश..
साप्ताहिक सागर आदित्य
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय कबड्डी मध्ये दैदीप्यमान यश..
..... वाशिम जिल्ह्यातील आदर्श व रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींचे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून नावलौकिक असलेले. नेहमीच तालुका जिल्हा विभागीय स्पर्धेमध्ये अग्रगण्य असलेल्या अशा भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आज दिनांक 1ऑक्टोबर रोजी याचं गोळे ज्ञा.च. गोळे कनिष्ठ महाविद्यालय केनवड तालुका रिसोड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ज्ञा. च. गोळे कनिष्ठ महाविद्यालय केनवडच्या विद्यार्थिनींचा पराभव करत विजेतेपद वटकावले आहेत. व तालुकास्तरीय स्पर्धेतून जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये किरण कैलास पवार (कप्तान) वैष्णवी डीडरकर (उप - कप्तान ), पुनम सदार,किरण सदार, संजीवनी धांडे, कार्तिकी गव्हाणे, पायल शिंदे, प्रतीक्षा खरात, प्रियंका ढोले,आणि सरिता खंडारे या सर्व विजयी स्पर्धक विद्यार्थीनीचे आणि विशेष करून अष्टपैलू विद्यार्थिनी कु. किरण कैलास पवार हिचे व मार्गदर्शक शिक्षक प्रा. पंजाब पानझाडे या सर्वांचे अभिनंदन व स्वागत कौतुक महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय मंजुषा सु.देशमुख मॅडम व पर्यवेक्षक आदरणीय सुनील डहाळके सर तसेच सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक - शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या वरील सर्वांनी अभिनंदन कौतुक करत पुढील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक 8 ऑक्टोबर रोजी पर्वतीबाई राठोड कन्या विद्यालय मंगरूळपीर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना अनंत अगणिक शुभेच्छा दिल्या.
0 Response to "भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय कबड्डी मध्ये दैदीप्यमान यश.."
Post a Comment