जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे बाळकडु!' सीईओ अर्पित चौहान यांचे 'मिशन स्पर्धा परिक्षा' अभियान
साप्ताहिक सागर आदित्य
'जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे बाळकडु!'
सीईओ अर्पित चौहान यांचे 'मिशन स्पर्धा परिक्षा' अभियान
ईयत्ता पहिली पासुन स्पर्धा परिक्षेची तयारी
मागे पडलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष
विद्यार्थ्यांचा पाया मजबुत करण्यावर भर
वाशिम दि.9
स्पर्धा परिक्षेत ग्रामिण भागातील विशेषत: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मागे पडु नये म्हणुन वाशिम जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत बालवयापासुनच स्पर्धा परिक्षेचे धडे देण्यासाठी मिशन स्पर्धा परिक्षा हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी जिल्ह्यातील निवडक शिक्षकांची बैठक घेऊन विचार मंथन केले. याबाबत लवकरच शिक्षकांची एक समिती गठीत करुन कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
काही राज्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणापासुन स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. इयत्ता 10 -12 वी पासुनच विद्यार्थ्यांना आयएएस- आयपीएस परिक्षांबाबत माहिती देऊन त्याची तयारी केली जाते. परिणामी उत्तर भारतातील अनेक राज्यामधील विद्यार्थी या स्पर्धा परिक्षांमध्ये आघाडीवर दिसतात. या पार्श्वभूमिवर वाशिम जिल्हा परिषद स्तरावर असा प्रयोग करण्यात येणार आहे.
-----
50 शिक्षकांशी साधला संवाद:
जिल्ह्यातील 10 आयडॉल शिक्षक आणि ५ वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांना नवोदय, शिष्यवृत्ती आणि एनएमएमएस परिक्षेची तयारी करुन देणारे 40 शिक्षक असे एकुण 50 शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (दि. 8) आमंत्रित केले होते. या 50 शिक्षकांशी सीईओ अर्पित चौहान यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी स्पर्धा परिक्षांबाबत अडचणी व आव्हाने याबाबत मनोगत व्यक्त केले. सामुहिक अभ्यास पध्दतीच्या माध्यमातुन मागे पडलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष पुरवुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे शिक्षकांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सीईओ चौहान यांनी यावेळी सांगितले.
-----
सुट्टीच्या दिवसातील योगदान महत्वाचे:
ज्या शिक्षकांची विद्यार्थी नवोदय किंवा इतर स्पर्धा परिक्षेत पात्र ठरतात त्या शिक्षकांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. त्यानुसार दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान तसेच शनिवार, रविवार आणि इतर कोणतीही सुट्टी न घेता जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांचे विद्यार्थी अधिक प्रमाणात यशस्वी ठरतात असे निरिक्षण काही शिक्षकांनी नोंदविले. अशा शिक्षकांचे सीईओ यांनी विशेष अभिनंदन केले. हे काम पुर्णत: ऐच्छिक असल्याचे सांगुन असे शिक्षक समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे मत चौहान यांनी व्यक्त केले.
-----
जि. प. शाळांची पटसंख्या वाढीला मदत:
पुरेशी पटसंख्या नसल्यामुळे एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याचे व शिक्षक अतिरिक्त ठरण्याचे संकट महाराष्ट्रातील शाळांवर आहे. परंतु दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नवोदय व शिष्यवृत्ती सारख्या परिक्षेत उत्तीर्ण होत असल्याचे पाहुन जि प शाळेतील विद्यार्थी पट संख्येत वाढ होत असल्याचे निरिक्षण काही शिक्षकांनी नोंदविले. जिल्ह्यातील साखरा व इतर काही शाळा याचे उत्तम उदाहरण आहेत. मात्र यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सिईओ चौहान यांनी व्यक्त केले.
या बैठकीला शिक्षणाधिकारी संजय ससाने आणि उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची उपस्थिती होती.
0 Response to "जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे बाळकडु!' सीईओ अर्पित चौहान यांचे 'मिशन स्पर्धा परिक्षा' अभियान"
Post a Comment