तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना गणेश सोळंके यांनी दिले निवेदन.....
साप्ताहिक सागर आदित्य
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना गणेश सोळंके यांनी दिले निवेदन.....
ग्राम गोभणी येथील भूमीहीन अनुसूचित जाती जमाती व भटके विमुक्त अल्पसंख्यांक व इतर कुटुंब मागील 40 वर्षापासून प्रयोजनासाठी अतिक्रमण करून राहत आहेत व ते नियमित पूर्वीपासून घर टॅक्स भरत आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड , विज बिल, जागेचा 8अ, असे अनेक पुरावे हे १ जानेवारी 2011 च्या पूर्वीचे आहेत व ते शासन निर्णय १ ऑगस्ट 2025 नुसार जागा नियमानुकूल करण्यास पात्र आहे परंतु ग्रामस्थरावर शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याकारणाने माननीय तहसीलदार तेजनकर मॅडम व गटविकास अधिकारी यांना 62 लोकांची पुराव्यानिशी यादी सह निवेदन देण्यात आले. यावेळी शेख नय्युम शेख शब्बीर ,गणेश श्रीराम सोळंके, शेख मुख्तार शेख रहीम ,गजानन मिल्ट्री पवार, विजय नारायण राऊत ,शेख मोईन शेख बाबू आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना गणेश सोळंके यांनी दिले निवेदन....."
Post a Comment