भा.मा कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये गिरवले जातात स्वयंशासनाचे धडे ........
साप्ताहिक सागर आदित्य
भा.मा कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये गिरवले जातात स्वयंशासनाचे धडे ........
रिसोड तालुक्यातील पहिली आणि एकमेव भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. तदनंतर या शिक्षक दिनाच्या औचीत्याने विद्यालयात स्वयंशासन हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनीनी संपूर्ण शाळा स्वतः चालवली असून त्यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकेच्या भूमिका साकारत सर्व विषय उत्तमरीत्या शिकविले.यामुळे विद्यार्थिनींना एक अध्यापनाचा अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळाली.मग त्यामध्ये प्राचार्या ( मुख्याध्यापिका ) दिव्या किशनराव देशमुख,पर्यवेक्षक, वर्गशिक्षिका व विषय शिक्षिका आरती आरती साळवे, वेदिका गोंधळे, श्वेता कोटकर, प्रीया खोडके, शिक्षा सपकाळ,धनश्री कोटकर, लक्ष्मी गवळी, वैष्णवी शेळके, अक्षरा कोटकर,मानसी सपकाळ,शिवानी देशमुख,नेहा खाडे, अक्षरा मजुळकर, दिव्या देशमुख, धनश्री कौटकर, मानसी मगर, नेहा सरकटे, शिवानी देशमुख, लक्ष्मी गवळी, श्रुती घोडे, आणि सेवक शिक्षकेतर कर्मचारी खुशी संदीप शिरसाट , अशा सर्व भूमिका स्वतः पार पाडत नवीन आदर्श निर्माण करून दिला. प्रत्येक वर्गात जाऊन आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी स्वतः निरीक्षण केले असता विद्यार्थिनींनी खूप उत्कृष्टरित्या अध्यापन आणि अध्ययन केले. शाळेची शिस्त ही वाखण्याजोगी होती. विद्यार्थिनी प्राचार्या, शिक्षिकेच्या पोशाखात अगदी शिस्तबद्ध खूप छान पद्धतीने स्वयंशासन व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या आदरणीय प्राचार्या मंजुषा सू.देशमुख मॅडम व पर्यवेक्षक आदरणीय सुनील हाळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Response to "भा.मा कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये गिरवले जातात स्वयंशासनाचे धडे ........ "
Post a Comment