
वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची कार्यशाळा संपन्न.
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची कार्यशाळा संपन्न.
वाशिम, दि 6 सप्टेंबर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळा वाशिम पंचायत समितीच्या सभागृहात (दि. ४)पार पडली.
गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत विस्तार अधिकारी डी.आर. साळुंखे, ग्राम पंचायत अधिकारी संजय नवघरे आणि जिल्हा परिषद वाशिमचे जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे यांनी मार्गदर्शन केले.
विस्तार अधिकारी (पंचायत) डी.आर. साळुंखे, ग्राम पंचायत अधिकारु अनिल सुर्य, विनायक बोरचाटे, श्री. जोशी तसेच स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक महादेव भोयर आणि इंगोले यांची यावेळी उपस्थिती होती.
ग्रामीण विकास, स्वच्छता आणि पंचायत राज संस्थांना सक्षम करण्यासाठी या अभियानाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांनी केले. ग्रामपंचायत अधिकारी संजय नवघरे (शेलू बुद्रुक) आणि अरविंद पडघन (अडोळी) आणि सरपंच शरद गोदारा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
-----
या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामपंचायतींना पारदर्शक, सक्षम आणि जनकेंद्रित बनविणे आहे. स्वच्छता, जलसंवर्धन, लोकसहभाग, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.
-----
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना उत्कृष्ट कामगिरीसाठी कोट्यवधी रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर निवड झालेल्या संस्थांना 5 कोटीपर्यंत रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यशाळेतून ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून विकास योजनांचा प्रभावी वापर करून समृद्ध व स्वच्छ गाव घडविण्यासाठी प्रयत्न करुन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर बक्षिस मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम पंचायत अधिकारी एस. झेड. बरेटिया यांनी केले.
0 Response to "वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची कार्यशाळा संपन्न."
Post a Comment