
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे "शिक्षक दिन"मोठ्या उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे "शिक्षक दिन"मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक प्रसन्न भगत सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी" स्वयंम- शासन दिना "चे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. यामध्ये मुख्याध्यापिका कु. चंचल नेमीचंद चव्हाण (१०वी) हिने जबाबदारी स्वीकारली. तिने अत्यंत उत्साहाने व आत्मविश्वासाने आपली भूमिका पार पाडली. तसेच स्वयंशासन दिनाच्या शिक्षिका, कु. धनश्री देवकर, वर्ग ५ वी परी कुऱ्हाडे, वैष्णवी खेमराज धांडे, आरती राठोड, सुरज देवकते, कु. नम्रता राठोड वर्ग ६ वी, ईश्वरी दरेकर, कोमल बोचट, वर्ग ९वा कु. ज्ञान दिपाली धट, मीनाक्षी ध ट, नव्या पडघान, वर्ग ८वी कु. ईश्वरी सोनोने, साक्षी राठोड, विवेक सचिन लोखंडे,वर्ग९ वी A - कु. भाग्यश्री देवकर, जानवी सोनोने,वर्ग१० वी कु. चंचल चव्हाण, मिताली गवई, साक्षी राठोड ह्या मुलींनी सहभाग घेतला होता. यामधून वर्ग ५,६,७ गटातून प्रथम क्रमांक कु. धनश्री गोपाल देवकर -५वा, दुसरा क्रमांक, संस्कृती मिलिंद पवार -७ वा तिसरा क्रमांक कु. नम्रता अविनाश राठोड -६वा. व माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक -कु. चंचल चव्हाण, वर्ग १०वी दुसरा क्रमांक -साक्षी राठोड
तिसरा क्रमांक -कु. ईश्वरी सोनोने अशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव आला.
यावेळी मुख्याध्यापक भगत सर यांनी आपल्या भाषणात शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक सतीश भगत सर, चंद्रशेखर वानखडे सर, रुपेश जयस्वाल सर, विकल सिंग राठोड सर, शिक्षिका, भालेराव मॅडम, लातूरकर मॅडम, सरनाईक मॅडम, इंगोले मॅडम, म्हात्रे मॅडम, इंगळे मॅडम, निलेश उजवे सर, अभी तायडे सर, मोसिन शेख सर, शिव मार्गे सर, सुरेश पारधी सर, गौतम भगत सर, हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे "शिक्षक दिन"मोठ्या उत्साहात साजरा "
Post a Comment