
गोभणी येथील ग्राम युवा करियर अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न.....,
साप्ताहिक सागर आदित्य
गोभणी येथील ग्राम युवा करियर अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न.....,
ग्राम गोभणी येथील स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण याची तयारी करत असलेल्या गावातील गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी पर्यवेक्षक आदर्श उपसरपंच आदरणीय अशोकराव देशमुख सर यांनी मिळणाऱ्या मानधनाचा रूपाया न घेता ते सर्व पैसे विद्यार्थ्यांच्या पुस्तकासाठी आणि अभ्यासिकेसाठी देतात व ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामसचिव राजेंद्र खरबळ यांच्या पुढाकारातून आज गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व अभ्यासिका स्थापन केली. गावातील ग्रामपंचायत च्या वतीने अनेक सुख सुविधा आणि योजना राबवत असतात याचाच एक भाग म्हणून आज 5 सप्टेंबर रोजी या अभ्यासिकेचे उद्घाटन गावचे ग्रामसचिव राजेंद्र खरबळ स आदर्श उप सरपंच अशोकराव देशमुख सर, पोलीस पाटील दुर्गादास खोडवे साहेब, सरपंच गजानन सरोदे, माजी सरपंच संदीप घायाळ, महाराष्ट्र पोलीस(छ. संभाजीनगर) दीपक मांडवगडे, माजी आदर्श शिक्षक भाऊराव साबळे सर, शेख आगा भाई,आरू मामा व आदर्श प्रा.गुलाब साबळे सर, गुलजार भाई या सर्व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. यासाठी अनेकांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली. त्यानंतर मान्यवरांनी स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पोलीस पाटील दुर्गादास खोडवे सर यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे अशा आपल्या मनोगतातून मोलाचा सल्ला दिला. आदरणीय आदर्श उपसरपंच अशोकराव देशमुख सर यांनी ही अभ्यासिका म्हणजे आपल्या प्रगतीतील एक मैलावरचा दगड ठरेल या मिळालेल्या संधीचं सोनं करा असा सूचक सल्ला दिला. तसेच ग्राम सचिव राजेंद्र खरबळ सर यांनी स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या अभ्यासिकेतून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत आमच्या परीने जी काही मदत लागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत असे भावोदगार व्यक्त केले. तसेच माजी सरपंच संदीप घायाळ यांनी विद्यार्थ्यांना मनोबल वाढवण्यासाठी अनुभवाचे सुचक सल्ले देत असताना कष्ट, जिद्द,साहस, चिकाटी हे जर आपल्याकडे असेल तर यशाला सहज गवसणी घालू शकतो असा मोलाचा सल्ला दिला. माजी आदर्श शिक्षक भाऊराव साबळे सर यांनी आपल्या मनोगतातून या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमच्याकडे सातत्य असणे गरजेचे आहे ते जर असेल तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालू शकाल असे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. शेवटी आदर्श प्राध्यापक गुलाब साबळे सर यांनी स्पर्धा परीक्षार्थींना अभ्यासाचे,परीक्षेचे नियोजन आणि यासाठी कशी तयारी करावी त्यातून यश कसे प्राप्त होईल असे मोलाचे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र पोलीस दीपक मांडवगडे व आरु मामा यानी सुद्धा विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बहारदार सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आदरणीय पोलीस पाटील दुर्गादास खोडवे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित गावातील गरजूवंत अभ्यासू विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to "गोभणी येथील ग्राम युवा करियर अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न....., "
Post a Comment