
आठवण करून देते, की प्रत्येक हसू, प्रत्येक यश आणि प्रत्येक छोटासा बदल हीच खरी शिक्षक काची कमाई आहे.
साप्ताहिक सागर आदित्य
शिक्षक… फक्त एक पदवी नाही, तर जबाबदारी आहे... 📚
शिक्षक म्हणून वर्गात पाऊल ठेवताना हातात पुस्तकं असतात पण मनात स्वप्नं असतात... विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमलणाऱ्या आनंदाची, त्यांच्या डोळ्यांत चमकणाऱ्या आत्मविश्वासाची, आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळवून देण्याची. कधी एखादं मूल अक्षर ओळखतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, कधी गणिताचं कठीण उदाहरण बरोबर सोडवल्यावर येणारा आत्मविश्वास, तर कधी सर “मॅडम, मी ```` झालो” असं हसत म्हणणारा विद्यार्थी... ही क्षणं शिक्षकाच्या आयुष्यातील खरी कमाई असतात.
असा एखादा क्षण ज्या शिक्षक यांच्या एखादा विद्यार्थी दप्तरातून फुलं काढून सर व "मॅडम, ही भेट माझ्याकडून... माझ्याकडे भेट दयायला फक्त हेच आहे." असं म्हणत फूल देतो..त्या क्षणाला शिक्षक. काच्या डोळ्यांत पाणी येतं. त्या क्षणी जाणवतं, शिक्षकाला सोन्या-चांदीच्या भेटींची गरजच नसते, विद्यार्थ्याचा निर्मळ स्नेह हीच सर्वात मोठी भेट असते.
एक विद्यार्थी शाळेत इतर मुलांच्या
तुलनेत थोडं अभ्यासात मागे राहायचा. सगळे त्याला कमी लेखायचे. पण रोज थोडं प्रेम, थोडा विश्वास, थोडा वेळ, थोडा धीर, आणि थोडी मेहनत.... थोडी समजुत आणि चुकांची थोडी सुधारणा आणि तो परीक्षेत चांगले गुण घेऊन आई-वडिलांसमोर हसत उभा राहिला. त्या आईच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या आनंदाश्रूंमध्ये "शिक्षकपणाचं खरं समाधान" सामावलं असतं.
शिक्षक फक्त अक्षरं शिकवत नाहीत, ते विचार करायला शिकवतात. ते प्रश्न विचारायला शिकवतात. आणि हो… ते स्वतःला विसरून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला प्रकाश बनतात.
आज शिक्षक म्हणून स्वतःला पुन्हा एकदा
आठवण करून देते, की प्रत्येक हसू, प्रत्येक यश आणि प्रत्येक छोटासा बदल हीच खरी शिक्षक काची कमाई आहे.
म्हणून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🌹...!!
✍️ साप्ताहिक सागर आदित्य
0 Response to "आठवण करून देते, की प्रत्येक हसू, प्रत्येक यश आणि प्रत्येक छोटासा बदल हीच खरी शिक्षक काची कमाई आहे. "
Post a Comment