त्र्यंबकेश्वर येथे गावगुंड प्रवृत्तीचा पत्रकारावर हल्ला
साप्ताहिक सागर आदित्य
त्र्यंबकेश्वर येथे गावगुंड प्रवृत्तीचा पत्रकारावर हल्ला
रिसोड : त्र्यंबकेश्वर (जि. नाशीक) येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुन्हा नोंदविण्यात येऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.अशि मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईद्वारा रिसोड संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना दिनांक 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे, निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दि. २० सप्टेबर २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार कुंभमेळा बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतांना महापालेकेने पार्कींग वसुलीसाठी नेमलेल्या व्यक्ती त्या परिसरात उपस्थित असलेल्या कर्मचात्यांनी पत्रकार किरण ताजने, योगेश खरे, सोनवणे, .यांना मारहाण करुन जखमी केलेल्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री या नात्याने तात्काळ गुन्हे दाखल करुन कडक कार्यवाही करावी. झालेला प्रकार हा निंदनीय असून असे प्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सहन करणार नाही. यासाठी कार्यवाही करीता आदेशीत करावे. आणी अशा गुंड प्रवृत्तीच्या कर्मचारी यांना कायम बडतर्फ करण्यात यावे, आणी पत्रकारांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या बाबतच्या अनेक बातम्या टि.व्हि. न्यूज चैनल, वृत्तपत्रातून व सोशल मिडिया मध्ये प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे असे प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी गृह विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. निवेदन देतांना गणेश देगावकर,नारायण आरू, ज्ञानेश्वर कायंदे,प्रदीप देशमुख,धनंजय माळेकर,अशोक चोपडे,शेख सरवर,सचीन गांजरे, धैर्यशील जोशी, सदाशिव साळेगावकर,रामेश्वर रंजवे,व रुपेश बाजड, विनोद बोडखे यांच्या सह अनेक पत्रकार मंडळी निवेदन देतांना उपस्थित होती.
0 Response to "त्र्यंबकेश्वर येथे गावगुंड प्रवृत्तीचा पत्रकारावर हल्ला "
Post a Comment