वाशिम जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन संघटनेच्या वतीने संघटन संदर्भात दौरा संपन्न!
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन संघटनेच्या वतीने संघटन संदर्भात दौरा संपन्न!
संपूर्ण महाराष्ट्रात माजी सैनिकाची संघटना असलेली व माजी सैनिकांसाठी काम करत असलेली सैनिक फेडरेशन वाशिम जिल्हा यांच्या वतीने रिठद येथे रिसोड तालुका सैनिक फेडरेशनच्या वतीने संघटनेचे संघटक वाढविण्यासाठी केलेल्या आयोजित कार्यक्रमासाठी मा.निंबाळकर साहेब जनरल सेक्रेटरी फेडरेशन महाराष्ट्र राज्य, शेख मोहम्मद खाॅजा सैनिक फेडरेशन अकोला जिल्हा सचिव, घनबहादूर साहेब उद्योग मंत्री सैनिक फेडरेशन महाराष्ट्र, समाधान तायडे सैनिक फेडरेशन कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे रिठद येथील सैनिक कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकरराव वडकर होते तर प्रमुख मार्गदर्शक निंबाळकर सैनीक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, तर प्रमुख पाहुणे शेख मोहम्मद शेख खाजा, धनबाद उद्योग मंत्री सैनिक फेडरेशन, समाधान तायडे कार्याध्यक्ष होते. या मान्यवरांचे शाल व पूष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हासचीव म्हणून अशोकराव इंगोले यांची नियुक्ती केली.तर बालाजी खडके यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती केली.यावेळी
निंबाळकर साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सैनिकासाठी असलेल्या योजना, सैनिकांना येत असलेल्या अडचणी सोडवणे, सैनिकांना गरज पडेल त्यावेळी सहकार्य करणे. वेळोवेळी अचानक जरी काम पडले तरी आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सहकार्य करणे. यासाठी सैनिक फेडरेशन हि संघटना सर्व माजी सैनिकांसाठी सदैव काम करत असते.या एक ना अनेक विषयावर निंबाळकर साहेबांनी प्रकाश टाकला. व सर्व सैनिकांच्या पाठीमागे सैनिक फेडरेशन ही संघटना प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असून जिल्ह्यातील आपल्या सैनिकाच्या समस्या सर्वांनी सोडवाव्या जेथे कुठे अडचण येत असेल तेथे आम्ही महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सोबत आहोत असे बोलताना सांगितले. तसेचसर्व माजी सैनिकांसाठी योजनेमध्ये ६५ वर्षानंतर पाच टक्के वाढ दर वर्षाला व्हायला हवी यासाठी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने भारत सरकारकडे संघटना मागणी करणार असल्याचे यावेळी निंबाळकर साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.हा कार्यक्रम संपल्यानंतर ब्राम्हण वाडा येथील माजी सैनिक भागवत ज्ञानबा हिवरे (मराठा लाईट ईफेंन्ट्री ) यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.आणी वाशिम जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.कावरखे यांची सदिच्छा भेट घेऊन शाल व पूष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.रिठद येथील कार्यक्रमाचे आयोजन रिसोड तालुका सैनिक फेडरेशन यांच्यावतीने करण्यात आले. रिसोड तालुक्याचे सैनिक फेडरेशनचे तालुकाध्यक्ष अर्जुन खानझोडे, ता.उपाध्यक्ष प्रल्हाद आरु, अशोक खानझोडे तालुका संघटक रिसोड, मालेगाव तालुकाध्यक्ष सुखदेव नानवटे , जिल्हा संघटक, निंबाजी आरु,जयाजी बोरकर, सुभाष ताजने इत्यादी माजी सैनिक उपस्थित होते.
0 Response to "वाशिम जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन संघटनेच्या वतीने संघटन संदर्भात दौरा संपन्न!"
Post a Comment