जीवन विद्या मिशन पुरस्कृत विद्यार्थी मार्गदर्शन अभियान दौऱ्याचा समारोप
साप्ताहिक सागर आदित्य
जीवन विद्या मिशन पुरस्कृत विद्यार्थी मार्गदर्शन अभियान दौऱ्याचा समारोप
वाशिम: जीवन विद्या मिशन सदगुरू श्री.वामनराव पै प्रणित विद्यार्थी मार्गदर्शन अभियान अंतर्गत २०२५ ते २०२६ या वर्षा मधिल ६९ वा हा दौरा वाशीम व मालेगाव या ठिकाणी दिनांक १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चार दिवसीय अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाकरिता आलेल्या नामधारकांची राहण्याची व्यवस्था भाऊसाहेब काळे यांनी भव्य अशा काळे लॉन वाशिम येथे करून खूप मोठे सहकार्य केले व तेथूनच अभियानाचा श्री.गणेशा झाला. महाराष्ट्रातील विविध शाखांमधून विविध क्षेत्रातून कार्यरत असणारे ६० नामधारक स्वयंसेवक हे प्रत्येकी ३५०० रुपये स्वत: खर्च करून सहभागी झाले होते.त्यांनी केलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन अभियानात "हे जग सुखी व्हावे व आपलं हिंदुस्तान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावे" हा सदगुरू श्री.वामनराव पै यांचा दिव्य संकल्प आहे हा संकल्प वास्तवात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत केले जीवन विद्येचे सर्व नामधारक सदैव कटिबद्ध असतात,हे दाखवून दिले.
"विद्यार्थी हे राष्ट्राचे खरे आधारस्तंभ असून जीवनविद्येचे हे शुद्ध ज्ञान शाळा-कॉलेज तसेच खेडेपाड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि सदगुरूंची संकल्प पूर्ती व्हावी हा विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाचा मुख्य उद्देश आहे." सदगुरूंची आज्ञा प्रमाण मानून या विद्यार्थी मार्गदर्शन अभियान दौऱ्याची सुरुवात करून पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत.सन २०१० सालापासून आतापर्यंत जीवनविद्या मिशन विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाचा विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांनी पुढीलप्रमाणे लाभ घेतला.
शाळा -कॉलेज उत्सव १०१८८ , शिक्षक ६८००९ व विद्यार्थी १९५२४८८ ही संख्या या अभियानाची फलश्रुती ठरवत आहे.१५ ते १८ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत वाशिम जिल्हा, मालेगाव तालुका व इतर तालुक्यातील शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी जीवनविद्या मिशन विद्यार्थी मार्गदर्शन अभियानातर्फे योग्य मार्गदर्शन व्हावे,या उदात्त हेतूने पुढील विषयांवर विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले.त्यात अभ्यासाच्या पद्धती व अभ्यासाचे महत्त्व, राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम, शरीराचे महत्त्व, चांगली संगती व व्यसनांपासून अलिप्ती,निसर्ग नियम व त्यांचे मानवी जीवनातील महत्त्वाचे स्थान.
यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
हा दौरा यशस्वी करण्यासाठी सांघिक भावना किती महत्त्वाची होती,ती सुरळीत व व्यवस्थित होण्यासाठी खालील प्रमाणे समिती नेमण्यात आली होती.त्यामध्ये दौरा प्रमुख म्हणून अनिल पोटे, दौरा सहाय्यक म्हणून सौ.अनुश्री खेडेकर, खजिनदार मिलन घरत, यतीन पाटील ,दौरा दिवसाचे नियोजक म्हणून मिलिंद माळकर, दिपक कोरगावकर,सौरभ भिरूड, स्वप्नील सावंत ,प्लॅनिंग टीम हेड मिलिंद माळकर , ग्रंथव्यवस्थापक शशिकांत तानवडे ग्रंथदिंडी खजिनदार निळकंठ कोळी
सर्वांसाठी जीवनविद्या पुस्तिका नितीन देवरे
प्रार्थना बॅनर उदय सावंत, स्वयंसेवक बॅच धनंजय गायकवाड, शाळेतील माहितीचा रिपोर्ट सौ.नेहा जेधे व नितीन सावंत
दौरा रिपोर्ट विठ्ठल गोळे अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या होत्या व त्या सर्वांनी उत्तमप्रकारे पार पाडल्यात.अर्थातच नेहमीप्रमाणे वेळोवेळी अभियान प्रमुख दिलीप निर्मळ, प्रबोधक पांडुरंग गोरे, ज्ञानदेव राणे, सुभाष पाटील, जनार्दन शेडगे व ज्येष्ठांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले.या अभियानात मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत पुढीलप्रमाणे होते.अनिल घुनागे उद्योग साईकृपा मोटार्स, अमोल मस्के नोकरी, अनंत मोरे, सेवानिवृत्त बीआयएसटी, अनिल पोटे नोकरी एअर इंडिया, चंद्रकांत परब, डी बी सावंत, सेवानिवृत्त असिस्टंट मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दीपक कोरगावकर एम.टेक.एनव्हायरमेंटल नोकरी सहाय्यक अभियंता बीएमसी, धनंजय गायकवाड, नोकरी बीआएसटी, दिलीप निर्मळ सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक, ज्ञानदेव राणे सेवानिवृत्त एमटीएनएल, जनार्दन शेडगे उद्योग प्रिटिंग प्रेस आर्थिक गुंतवणुक सल्लागार, कृपाल पेडणेकर नोकरी, मधुसूदन कटोड, मिलन घरत नोकरी एक्झेक्यूटीव्ह, अकाउंट्स अँड फायनान्स, मिलिंद माळकर, नोकरी प्रोजेक्ट लीडर एलटीआय माईंडट्री, मोहनीश आपकार नोकरी सारस्वत बँक, नीलकंठ कोळी सेवानिवृत्त जनरल मॅनेजर, बीपीसीएल, नितीन देवरे नोकरी एचयुएल, नितीन सावंत सेवानिवृत्त एमटीएनएल, प्रवीण तिर्लोटकर नोकरी, पांडुरंग गोरे सेवानिवृत्त असिस्टंट मॅनेजर एअर इंडिया, प्रशांत पाटणकर नोकरी असोसिएट क्रिएटिव्ह डायरेक्टर आर्ट, प्रशांत माईणकर एम.ए.बी.एड.नोकरी सहाय्यक शिक्षक, रामकृष्ण परब सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक, रविंद्रनाथ चव्हाण उद्योग, रत्नाकर अनुभास्कर, नोकरी शिक्षण गट अधिकारी, सौरभ भिरुड एमबीए उद्योग एस.ए.अकॅडमी, संजय घाग पोलिस निरीक्षक, स्वप्नील सावंत, नोकरी सॉफ्टवेअर इंजिनिअर क्यूटू इनकॉर्पोरेशन, स्वप्नील बी.सावंत उद्योग, शशिकांत तानवडे सेवानिवृत्त मुबंई युनिव्हर्सिटी, शिवाजी पडगे उद्योग, सुभाष पाटील सेवानिवृत्त, सुरेश चव्हाण सेवानिवृत्त आयईएस विद्यालय, उमेश गाड नोकरी सिनिअर टेक्निशियन बेस्ट ,उदय पाटणकर उद्योग आर्थिक गुंतवणूक सल्लागार, उदय सावंत उद्योग सर्जिकल आर्थिक गुंतवणूक, विठ्ठल गोळे नोकरी सिनिअर ऑफिसर, यतीन पाटील सी.ए.नोकरी इंदोरामा व्हेंचर्स लि. वामन जोशी उद्योग इंजीनियर, अक्षता काकडे गृहिणी, अन्सीका निर्मळ सी.ए.गृहिणी, अनुश्री खेडेकर उद्योग - मिलिंद ज्वेलर्स, अरुणा भिरुड उद्योग स्वतंत्र शिक्षिका, डॉ. कविता काळे, , कुंदा नारखडे गृहिणी, मालती कोलते गृहिणी, निशिगंधा मानकर नोकरी, नेहा जेधे नोकरी, पूनम जोशी नोकरी, प्राध्यापक ज्युनिअर कॉलेज, प्रियंका घाडगे गृहिणी, रंजना बागुल गृहिणी, सुजाता जेधे गृहिणी, शोभा मोहिते गृहिणी तसेच भाऊसाहेब काळे, तरण सेठी बाबूजी, सुभाष निगोट, गजानन काळे, अविनाश मारशेटवार, विशाल राजगुरू, वामन राजगुरू, मनीष गाडिया, प्रकाश घुगे, संदीप कड, रवी मोरे कारंजा, हरिओम गावंडे, सशांक जाधव, पर्वेज शेख, खोजमा कोठेवाला, राम मारशेटवार, अजय कव्हर, गोपाल कव्हर,
डॉ.चंदन वाणी, निखिल कांत, सौ.अर्चना घुनागे, सौ.वृषाली टेकाळे, एकनाथ सुरूशे, ॲड.सुरेश टेकाळे, प्रमोद टेकाळे, कुदनसिंग ठाकूर, किशोर झुंझारे, प्रफुल चांडगे, नाना काकडे, भरत काकडे, रवी राजगुरू, राहुल पंडितकर, अंकुश आंबटपुरे, गणेश इढोळे, रवींद्र खुणे मंगरुळपीर, पत्रकार निलेश सोमाणी, दिनकर सुरूशे, तुळशीराम जाधव मानोरा, दशरथ गायकवाड, बिटू ऑटोवाले, राजा टेमरे ही मंडळी आणि वाशिम मधील मंडळी यांचे सहकार्यामुळे हा दौरा यशस्वी झाला.या दौऱ्यात सहभागी झालेले व तन-मन-धनाने साथ देणाऱ्या प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचललेला अगदी एकत्वाने केलेल्या कार्याची प्रचिती म्हणून सदगुरूंच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या प्रयत्नातून१६ व १८ सप्टेंबर या तीन दिवसात २८९ उत्सव झालेत.त्यामध्ये १७९९ शिक्षकांनी ४७२५६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या उत्सवामध्ये विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांना जीवनविद्येचे अमूल्य मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य करण्यात आले.याच उपक्रमा अंतर्गत सहभागी शाळा/महाविद्यालयांना खालील साहित्य भेट देण्यात आले.
"सर्वांसाठी जीवनविद्या" पुस्तिका प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांसाठी, शाळेसाठी विश्वप्रार्थनेचा फलक, सदगुरू श्री.वामनराव पै लिखित "लघुग्रंथ संच"देण्यात आले. या तीन दिवसांत एकूण ३१,८१० रूपयांचे ज्ञानदान करण्यात आले.प्रत्यक्ष शाळा,कॉलेजात जेव्हा हे वक्ते सदगुरूंची विचार व जीवनविद्येचे संदेश मांडतात, तेव्हा त्या विचारांचा संपूर्ण सभागृहावर प्रभाव पडतो. हा प्रभाव विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या व मान्यवरांच्या अभिप्रायांमधूनही ठळकपणे जाणवते.
वास्तव्याच्या ठिकाणी सायंकाळी ठीक ५ वाजता एक अत्यंत पवित्र असा "उपासना यज्ञ"संपन्न झाला.या यज्ञाची सुरुवात श्री. मोहनीश आपकर यांनी "उपासना यज्ञाचे महत्त्व"विशद करत केली. त्यांनी सर्वांना या यज्ञात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, उपासना यज्ञामुळे वातावरण शुद्ध होते, पुण्य संचित होते आणि कोणतेही कार्य अधिक शक्तिशाली आणि फलदायी स्वरूपात पूर्ण होते. याप्रसंगी वाशिम, मंगरूळपीर, कारंजा येथील नामधारक पदाधिकारी विशेषतः उपस्थित होते.या यज्ञाने संपूर्ण दौऱ्याच्या कार्याला एक अध्यात्मिक गती व आंतरिक ऊर्जा प्रदान केली.दौऱ्याची तयारी फक्त नियोजनापुरती मर्यादित नसते, तर ती सहकाऱ्यांची ओळख, नाते, आणि ऊर्जा एकत्र बांधणारी प्रक्रिया असते. याच भावनेतून नामधारक स्वप्नील सावंत यांनी दौऱ्यात सहभागी झालेल्या खालील कार्यकर्त्याची अनोख्या आणि हृदय शैलीत ओळख करून दिली.त्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या दृष्टीने वक्ते व सहकार्यांची शाळा नियोजन गट ठरविण्यात आले. त्यासाठी तीन दिवसांच्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन लक्षात घेऊन जनार्दन शेडगे यांनी तयार केलेली विशेष नियोजन डायरी सर्व कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आली.जी पुढील प्रत्येक दिवशी मार्गदर्शक ठरली. या बैठकीत, वाहनात कोणते वक्ते व कोणते सहकारी असावेत, त्यांचे शाळेतील कार्य कसे पार पडावे, याबाबत दिलीप निर्मळ व दौरा प्रमुख अमित सोगम यांनी अत्यंत स्पष्ट व थेट सूचना देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.राजेंद्र मार्शेटवार, संदीप कड, विशाल राजगुरू, ॲड. सुरेश टेकाळे, प्रकाश घुगे, रवींद्र मोरे,अनिल घुनागे, सुभाष निघोट, जनार्दन शेडगे या वाशिम मधील सर्व नामधारकांनी केवळ वाहनच उपलब्ध करून दिले नाही तर काहीजण चक्रधराचे,वाहनचालकाचे कार्य करित होते, काहीजण नियोजन, वेळपालन व गट व्यवस्थापनात अग्रेसर होते.यामुळे संपूर्ण दौऱ्याचे शाळावार नियोजन अधिक सुसंगत, वेळेत आणि कार्यक्षमतेने पार पाडता आले. ही व्यवस्था म्हणजे केवळ यंत्रणेची नव्हे तर निःस्वार्थ सेवाभावाची आणि संघबांधणीची साक्ष होती.शेवटी हा दौरा संपला असे भासत असले तरीही "ही तर सुरुवात आहे एका दिव्य सदगुरूंच्या कार्याची, जीथे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सदगुरूंची शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत पोहोचवायची आणि राष्ट्रहिताच्या संकल्पासाठी एक दिलाने कार्य करायची,ही भावना समारोप प्रसंगी व्यक्त होत होती.
0 Response to "जीवन विद्या मिशन पुरस्कृत विद्यार्थी मार्गदर्शन अभियान दौऱ्याचा समारोप"
Post a Comment