जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दिनांक 17 रोजी शुभारंभ करण्यात आला.
यानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री या गावातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
ग्रामविकासाच्या योजनांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानातून राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती व 40 हजार गावे मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
--------
सीईओ अर्पित चौहान यांची उपस्थिती
जिल्ह्यातील कोंडाळा झांबरे (ता. वाशिम) या गावात झालेल्या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांची उपस्थिती होती.तसेच इतर गावांमध्ये पंचायत समिती स्तरावरून नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती.
--------
या अभियानांतर्गत कोट्यावधी रुपयांची बक्षीस गावांना मिळणार आहेत. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या अभियानातील स्पर्धेत यशस्वी ग्रामपंचायतींना तब्बल 250 कोटींची पारितोषिके दिली जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पारितोषिके देणारी ही पहिलीच योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
0 Response to "जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ"
Post a Comment