स्वच्छता ही सेवा या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मंगरूळपीर तालुक्यातील जनुना बु. या गावात
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छ ही सेवा 2025 या मोहिमेचा शुभारंभ
वाशिम
स्वच्छता ही सेवा या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मंगरूळपीर तालुक्यातील जनुना बु. या गावात (दि. 17) करण्यात आला. जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा मंगरूळपीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या हस्ते गावातील कुटुंबांना प्रत्येकी दोन कचराकुंड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच रूपाली नितेश खडसे, पंचायत विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण, कृषी विस्तार अधिकारी रवींद्र वाढणकर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राम श्रृंगारे, पंचायत विस्ताराधिकारी इम्रान शेख आणि पंचायत समितीचे गट समन्वयक (बीआरसी) प्रवीण आखाडे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेला महिला व पुरुषांचे मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची माहिती वाढणकर यांनी दिली तर स्वच्छता ही सेवा या अभियानाबाबत राम श्रृंगारे यांनी माहिती दिली.
-----
*नितेश खडसे यांच्यामार्फत शाळेला प्रोजेक्टर*
जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्याच्या उद्देशाने गावातील सामाजिक कार्यकर्ते नितेश खडसे यांच्यामार्फत शाळेला एलसीडी प्रोजेक्टर भेट देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तापी यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका यांना प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
------
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांनी यावेळी जनुना गावातील लोकसहभाग पाहून कौतुक केले. त्यांनी गावातील ग्राम पंचायत भवन, शाळा व अंगणवाडी तसेच ओपन जिमची पाहणी केली. ग्रामविकासाबाबत त्यांची सामाजिक कार्यकर्ते नितेश खडसे यांचे अभिनंदन केले. गावातील सर्व पदाधिकारी व नागरिकांनी एकजुटीने काम केल्यास जनुना बु. ही जिल्ह्यात आदर्श ग्राम पंचायत ठरेल असे भाकीत केले.
--------
यावेळी नितेश खडसे यांनी लोकसहभागाच्या माध्यमातून गावात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी यावेळी उपसरपंच सुनील नवघरे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना महेंद्र पाटील, वनिता रविंद्र मनवर, सुरक्षा नाना भुसारे, कोंडाबाई किसन धनकर, सुशिला मधुकर पाटील, पुरुषोत्तम बापुराव पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत अधिकारी अमोल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत ऑपरेटर गोपाल वकटे यांनी केले.
कार्यक्रमाला नितेश दशरथ खडसे, ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानदेव महादेव काजळे, महेंद्र विश्वनाथ पाटील, किसन विठोबा धनकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "स्वच्छता ही सेवा या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मंगरूळपीर तालुक्यातील जनुना बु. या गावात"
Post a Comment