गोभणी येथे कृषी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
गोभणी येथे कृषी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रा.गुलाब साबळे - अभिव्यक्ती सामर्थ्य
मौजे गोभणी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रकल्प संचालक आत्मा, वाशिम श्रीमती अनिसा महाबळे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बबनराव पाटील गारडे यांनी भूषविले. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी मदन शिंदे, तज्ञ प्रशिक्षक संजय मांडवगडे, दुर्गादास खोडवे पोलीस पाटील गोभणी, सौ. विद्याताई सरोदे सरपंच ,संदीप घायाळ माजी सरपंच यांच्यासह गावातील मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये प्रभाकर पाटील साबळे, रमेश नाना साबळे, डॉ.एन.वाय. साबळे, वसंतराव हरकळ, धनंजय साबळे, गुलाबराव साबळे, लक्ष्मण साबळे सर तुळशीदास खराटे, दिपक सरोदे, रामेश्वर साबळे, दिपक साबळे, दत्तराव साबळे, उद्धव राऊत, हनुमान साबळे, भाऊराव साबळे सर, शेषराव साबळे, पिंटू आरू, सतीश मांडवगडे,विशाल साबळे,विष्णू साबळे यांचा विशेष सहभाग होता.
या प्रशिक्षणाचे आयोजन कृषी देवता नैसर्गिक शेती मिशन शेतकरी गट, गोभणी यांनी केले. विशेष म्हणजे, गोभणी गावातील शेतकरी हळद पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. यासंदर्भात तज्ञ प्रशिक्षक संजय मांडवगडे यांनी शेतकऱ्यांना हळद पिकावर विशेष मार्गदर्शन केले. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील बांधावर जैविक निविष्ठा कमी खर्चात तयार करावी, यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल व सूक्ष्म अन्नद्रवे सहज पिकाला उपलब्ध होतील या जैविक निविष्ठा चां वापर योग्य प्रमाणात केला तर शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कार्यक्रमादरम्यान माननीय प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती अनिसा महाबळे मॅडम यांनी शेतकऱ्यांशी हितगुज करत “महाविस्तार ॲप” विषयी सविस्तर माहिती दिली. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध योजनांची माहिती, तसेच कृषी क्षेत्रातील ताज्या घडामोडी सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आधुनिक तंत्रज्ञान व नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून शेतकरी अधिक सक्षम व आत्मनिर्भर होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच चिया पिकाबदल मार्गदर्शन केले व चिया पुस्तकाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गादास खोडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप मोरे यांनी केले.
0 Response to " गोभणी येथे कृषी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न"
Post a Comment