स्वच्छता ही सेवा' अंतर्गत जिल्ह्यात महाश्रमदान! सुपखेला गावात जिज्हा स्तरीय अधिकारी सहभागी
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छता ही सेवा' अंतर्गत जिल्ह्यात महाश्रमदान!
सुपखेला गावात जिज्हा स्तरीय अधिकारी सहभागी
मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अर्पित चौहान आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कालिदास तापी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय महाश्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता ही सेवा २०२५ अंतर्गत आज ग्रामपंचायत सुपखेला ता. वाशिम येथे महाश्रमदान करण्यात आले. 'एक दिवस- एक तास- एक साथ' या अंतर्गत सकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान श्रमदान करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रफुल्ल काळे, राम श्रृंगारे, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ पट्टेबहादूर, विस्तार अधिकारी अनिल सूर्या, ग्रामपंचायत अधिकारी अष्टशिला जाधव, रमेश ठाकरे, कांताबाई राजे, सूनिताताई ठाकरे, राजू ठाकरे, बीआरसी महादेव भोयर आणि वसंता इंगोले यांच्यासह सर्व आजी माजी सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसर, अंगणवाडी परिसर, सामाजिक सभागृह व गावातील मुख्य रस्ता स्वच्छ करण्यात आला. तसेच दर 15 दिवसांनी स्वच्छता उपक्रम राबविण्याबाबत संकल्प करण्यात आला.
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार 25 तारखेला सर्व ग्रामपंचायत मध्ये "महाश्रमदान- एक दिवस, एक तास, एक साथ" असा उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व ग्रामपंचायत मध्ये महा श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय टीम सुपखेला या गावातील महा श्रमदान कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.
------------
गाडगेबाबांनी वेधले लक्ष:
"महाश्रमदान- एक दिवस, एक तास, एक साथ" या उपक्रमांतर्गत वाशिम तालुक्यातील सुपखेला या गावात ग्राम पंचायतीच्या वतीने स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातात खराटा घेऊन साक्षात गाडगेबाबा गावात येऊन स्वच्छता करत आहेत की काय असा भार गावकऱ्यांना झाला. वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंत असलेले पी. एस. खंदारे यांनी गाडगेबाबांची हुबेहुब नक्कल करत त्यांच्याच वेशात गावात प्रवेश करुन गावातील मंदिर परिसराची स्वच्छता केली. गोपाला- गोपाला असे किर्तन गाऊन त्यांनी लोकांना स्वच्छतेबाबत संदेश दिला. तसेच व्यसनमुक्ती आणि अंधश्रध्दा निर्मूलन याबाबतची लोकांचे प्रबोबधन केले.
0 Response to "स्वच्छता ही सेवा' अंतर्गत जिल्ह्यात महाश्रमदान! सुपखेला गावात जिज्हा स्तरीय अधिकारी सहभागी"
Post a Comment