गोभणी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
साप्ताहिक सागर आदित्य
गोभणी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
मौजे गोभणी येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन 2011 पूर्वीच्या निवासी कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी पुराव्यानिशी 112 प्रस्ताव पंचायत समिती रिसोड येथे सादर करण्यात आले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 'सेवा पंधरवडा' या शासकीय कार्यक्रम नुसार पंचायत समिती , तहसील कार्यालय व पुढील कारवाईस जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे प्रस्ताव जाण्यास विलंब होत आहे. या कामास गती मिळावी,व जागा नियमानकुल व्हावी. म्हणूनच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री योगेश कुंबेजकर साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी माननीय माजी मंत्री अनंतराव देशमुख, गोभणी जिल्हा परिषद सदस्य अमोल भुतेकर, ग्रामपंचायत उपसरपंच अशोकराव देशमुख, शेख नईम, शेख मजर, शेख मोईन, विजय राऊत ,शेख वाहप, मिल्ट्री पवार, शुभम साबळे, ब्रह्मदेव साबळे, किशोर टाटर ,दीपक घायाळ, सतीश काकडे, पंकज माळोदे, सुनील साबळे, रामचंद्र धारकर, रामा काळदाते, गजानन पवार, सतीश काळदाते, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "गोभणी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन"
Post a Comment