
सुसज्ज संगणक लॅबमुळे शाळा डिजिटल युगात. 'सिस' फाउंडेशनचे अभिजीत जोशी यांचे प्रतापादन
साप्ताहिक सागर आदित्य
सुसज्ज संगणक लॅबमुळे शाळा डिजिटल युगात.
'सिस' फाउंडेशनचे अभिजीत जोशी यांचे प्रतापादन
वाशिम,
"तंत्रज्ञान शिक्षण, वाचन आणि संशोधन वृत्ती या त्रिसूत्रीला आत्मसात करून आजचा विद्यार्थी उद्याचा भारत समृद्ध, स्वयंपूर्ण आणि शक्तिशाली बनवेल," असा विश्वास 'सिस' फाउंडेशन डोंबिवलीचे कार्याध्यक्ष
अभिजीत जोशी यांनी (दि. २) शनिवारी व्यक्त केला.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे सीस फाउंडेशन डोंबिवलीच्या वतीने कै. पांडुरंग बापूजी पाटणकर यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आणि डॉ. धनंजय पाटणकर (बेंगळूर) यांच्या सौजन्याने शाळेसाठी संगणक लॅबकरीता फर्निचरसह संपूर्ण डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विज्ञान व तंत्रज्ञानाचे आजच्या युगातील महत्व विशद केले आणि ग्रामीण भागातही डिजिटल साक्षरता पोहोचवण्याचे कार्य सिस फाउंडेशन करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ इंगळे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक संदीप घुगे, गटशिक्षणाधिकारी मदन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन बाजड, केंद्रप्रमुख आनंद सुतार व तज्ञ मार्गदर्शक स्वाती ढोबळे यांची उपस्थिती होती.
या लोकार्पण सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या हर्षोल्हासात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदवीधर शिक्षक दिगंबर घोडके यांनी तर आभारप्रदर्शन गजानन काळे यांनी केले.
संगणक लॅबच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मोठी पायरी ठरणार आहे.
0 Response to "सुसज्ज संगणक लॅबमुळे शाळा डिजिटल युगात. 'सिस' फाउंडेशनचे अभिजीत जोशी यांचे प्रतापादन"
Post a Comment