-->

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी  यांचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नवा आत्मविश्‍वास

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नवा आत्मविश्‍वास



साप्ताहिक सागर आदित्य 

 ‘वाशिम शेती शिल्प’चे चिया बियाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट 


 जिल्हाधिकारी बुवनेश्वरी  यांचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नवा आत्मविश्‍वास


वाशिम, 

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे प्रतीक ठरलेल्या ‘वाशिम शेती शिल्प’ या स्थानिक कृषी ब्रँडखाली उत्पादित चिया बियाण्यांचे नमुने आज  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना भेट स्वरूपात सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.  यांनी हा उपक्रम हाती घेत शेतकऱ्यांच्या उत्पादने राज्यस्तरावर पोहोचवण्याची दिशा दाखवली आहे.


 जिल्हा कृषीप्रधान असून, इथल्या शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनामध्ये आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शेतमालाला एक विशिष्ट ओळख देण्यासाठी ‘वाशिम शेती शिल्प’ हा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. या अंतर्गत उत्पादित होणारी चिया बियाणे ही एक पोषणमूल्यांनी समृद्ध आणि बाजारात मागणी असलेली नगदी पीक मानली जाते.


या भेटीद्वारे ना केवळ वाशिमच्या कृषी उत्पादनांना मान्यता मिळाली, तर शेतकऱ्यांच्या परिश्रमालाही शासनपातळीवर गौरव मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांपुढे हा उपक्रम मांडताना सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पादन हे दर्जेदार असून, योग्य मार्केटिंग आणि शासनाची साथ मिळाल्यास त्यांचा आर्थिक स्तर उंचावता येईल.


‘वाशिम शेती शिल्प’ या ब्रँडअंतर्गत पुढील काळात इतरही उत्पादनांना स्थानिक ओळख देत सस्टेनेबल मार्केट साखळी निर्माण केली जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांमध्येही नव्या प्रेरणेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


मुख्यमंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

0 Response to "जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नवा आत्मविश्‍वास"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article