
भा. मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती
साप्ताहिक सागर आदित्य
भा. मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती
साजरी............ भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करत असताना प्रथमतः शाळेच्या प्राचार्या आदरणीय मंजुषा सु. देशमुख मॅडम, आदरणीय पर्यवेक्षक सुनील डहाळके सर, ज्येष्ठ शिक्षिका मंगला शेटे मॅडम, प्रमुख अतिथी प्रा. गुलाब साबळे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे या महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन आणि हारअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे,पोवाडे,गीत विद्यार्थिनींनी सादर केले त्यामध्ये आरती साळवे जान्हवी कांबळे अनन्या वाठोरे गायत्री गर्जे पूजा जाधव समृद्धी मोरे सिद्धी खोडके कोमल पोपळघट कीर्ती कराड योगिता पुरी वर्षा गुंजाळ प्रतीक्षा फुंदसे श्रावणी खाडे वैष्णवी मोरे श्रुती खामकर आकांक्षा घुगे साक्षी लाटे अक्षरा लोखंडे राधिका हाडे समृद्धी खडसे भारती गव्हाणे मान्यता भोसले गायत्री वामन साक्षी मुंडे श्रावणी खराटे दुर्गा डोरले कविता टाकरस स्नेहा मुंजे भाविका भोपाळे मोनू गवळी वैष्णवी शेळके तनिष्का खिल्लारे श्रुती घोडे दिपाली गरकळ ईश्वरी खोडे सेफीन शेख प्रगती सुरकुटे सेजल टिकाइत वैभवी मोरे श्रद्धा जहिरव ईश्वरी उपाड अपूर्वा मोरे प्राजक्ता भोसले चेतना देशमुख संस्कृती पावडे स्नेहा मुंजे मान्यता भोसले समृद्धी मोरे विद्यार्थिनीनी विचार व्यक्त केले. त्यानंतर सचिन पायघन सर ज्येष्ठ शिक्षिका मंगला शेटे मॅडम व पर्यवेक्षक आदरणीय सुनील डहाळके सर प्रमुख अतिथी प्रा. गुलाब साबळे सर या मान्यवरांनी आपल्या भाषणातून महापुरुषांचे कार्य कर्तृत्व आणि विचार आजही कसे अजरामर आहेत प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा असा सूचक सल्ला आपल्या मनोगतातून व्यक्त केला. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय मंजुषा सु.देशमुख मॅडम यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कसे नरकेसरी, वकील पत्रकार समाज सुधारक साहित्यिक विचारवंत होते. तसेच मराठी साहित्यामध्ये सोनेरी अक्षरांनी ज्यांचे नाव लिहावं असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे मराठी साहित्याला एक मोठी देन होय.त्यामध्ये 35 कादंबऱ्या 15 लघु कथा 12 पटकथा 14 लोकनाट्य कित्येक पोवाडे एक प्रवास वर्णन हा मराठीतील अमूल्य खजिना अण्णाभाऊंनी आपणाला बहाल केला असा मराठी साहित्यातील कोहिनूर हिरा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपल्या विचारातून अभिवादन केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापिका साधना बोरकर मॅडम तर आभार प्रदर्शन मंगला शेटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला इयत्ता पाचवी पासून तर बारावी पर्यंत विद्यार्थीनी उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "भा. मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती "
Post a Comment