-->

वृक्षलागवडीने सुशोभित पांदनरस्ते  महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात पर्यावरणपूरक उपक्रम

वृक्षलागवडीने सुशोभित पांदनरस्ते महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात पर्यावरणपूरक उपक्रम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वृक्षलागवडीने सुशोभित पांदनरस्ते

महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात पर्यावरणपूरक उपक्रम


जिथे माती, तिथे वृक्ष – निसर्गासाठी हा संकल्प


वाशिम,  – महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी वाशिम दि.३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात पर्यावरणपूरक वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुकानिहाय निवडलेल्या तीन गावांमधील पांदन/शिवारस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.


या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनासोबतच महसूल विभागाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणे हा असून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत ग्रामपातळीवर रस्त्यांचे पुनरुज्जीवन व हिरवाई वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


राजगाव मंडळात गणेशपूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसिलदार निलेश पळसकर यांची उपस्थिती लाभली. याठिकाणी बोरखडी व उकळीपेन गावांमध्येही वृक्षलागवड करण्यात आली.


अनसिंग मंडळात खडसिंग, अनसिंग व पिंपळगाव येथे नायब तहसीलदार कैलास देवळे व मंडळ अधिकारी राजेश इढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला. पार्डी आसरा मंडळात उमरा शम., फाळेगाव थेट येथे, तर केकतउमरा मंडळात अडोळी, तामसाळा, कोकलगाव येथे वृक्षलागवड करण्यात आली.


कोंडाळा झामरे मंडळात माळेगाव, सावंगा जहागीरसह तीन गावांमध्ये, वारला मंडळात शीरपुटी ते ब्रम्हा या मार्गावर, तसेच वाशिम मंडळात झाकलवाडी, आडगाव ते देवाळा दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले. नागठाणा मंडळातील नागठाणा, सावरगाव बर्डे, मोहजा आणि पार्डी टकमोर मंडळातील कळंबा महाली, खरोळा गावांमध्येही हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


या उपक्रमात महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, विविध शासकीय कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.


महसूल विभागाच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला हा उपक्रम ग्रामविकास, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या संत तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे वाशिम जिल्हा हिरवळीत नटणार, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

0 Response to "वृक्षलागवडीने सुशोभित पांदनरस्ते महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात पर्यावरणपूरक उपक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article