-->

महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सेवा तुमच्या दारी!  वाशिम तालुक्यात ८ ठिकाणी शिबिरांचे आयोजन, नागरिकांना मिळाले विविध प्रमाणपत्रे व लाभ

महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सेवा तुमच्या दारी! वाशिम तालुक्यात ८ ठिकाणी शिबिरांचे आयोजन, नागरिकांना मिळाले विविध प्रमाणपत्रे व लाभ



साप्ताहिक सागर आदित्य 

महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सेवा तुमच्या दारी!

वाशिम तालुक्यात ८ ठिकाणी शिबिरांचे आयोजन, नागरिकांना मिळाले विविध प्रमाणपत्रे व लाभ

वाशिम, 

दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभर साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी वाशिम तालुक्यातील विविध मंडळांमध्ये "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान" अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने विविध शासकीय सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्यात आल्या.


आज दि. ४ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, पार्डी आसरा, पार्डी टकमोर, नागठाणा, कोंडाळा झामरे, वारला, राजगाव या आठ मंडळांमधील उकळीपेन व केकतउमरा येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, नॉन क्रिमीलेयर, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, ईडब्लूएस प्रमाणपत्र, आधार कार्ड, सातबारा, आयुष्यमान गोल्डन कार्ड, जॉब कार्ड, शिधापत्रिका, अग्रीस्टक प्रमाणपत्र, जलतारा योजना यांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान योजना यांसारख्या सामाजिक योजनांचे लाभ देण्यात आले.


कार्यक्रमात निलेश पळसकर (तहसीलदार वाशिम), सुभाष जवंजाळ, कैलास देवळे, राजेश इढोळे, बरेटीया, दिनोरीया, आदबाने, साहेबराव नप्ते, सि. एस. आडे, करवते साहेब, गजानन इप्पर हे मंडळ अधिकारी व सहाय्यक अधिकारी उपस्थित होते. तसेच संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, तात्काळ प्रमाणपत्र वाटप, तसेच महसूल खात्याशी संबंधित सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचा भरघोस लाभ घेतला असून, महसूल प्रशासनाचे यासाठी कौतुक होत आहे.

0 Response to "महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सेवा तुमच्या दारी! वाशिम तालुक्यात ८ ठिकाणी शिबिरांचे आयोजन, नागरिकांना मिळाले विविध प्रमाणपत्रे व लाभ"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article