-->

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप.   वाशिम

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप. वाशिम



 साप्ताहिक सागर आदित्य 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप. 

वाशिम 

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात निरोप देण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी निकम यांचा  शाल, श्रीफळ आणि विठ्ठल-रुक्मिणी यांची प्रतिकृती भेट देऊन सपत्निक सत्कार केला.

याप्रसंगी निकम यांची पत्नी संगिता निकम, मुलगा अथर्व आणि मुलगी आनंदी तसेच मोठे भाऊ राजेंद्र पंत निकम यांची उपस्थिती होती. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने, राम श्रृंगारे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त करून निकम साहेबांना पुढील आरोग्यमय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी  निकम यांच्या पत्नी संगिता निकम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. नोकरी करत असताना आर्थिक नियोजन आणि कुटुंबाला वेळ देण्याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक कालिदास तापी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल बोरखडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, अतिरिक्त गटविकास अधिकारी गजानन खुळे त्यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने निकम यांचा यावेळी सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधिकारी अभिजीत देवगिरीकर यांनी केले.

0 Response to "अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप. वाशिम "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article