
हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ मोहीम प्रभावीपणे राबवा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ मोहीम प्रभावीपणे राबवा
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांचे आवाहन
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्हाभरात मोहिमेचं आयोजन!
वाशिम,
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि राज्य पाणी व स्वच्छता विभाग यांच्या निर्देशानुसार "हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता – स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग" ही राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती मोहीम ८ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, स्वराज्य संस्था, स्वयंसेवी गट, विद्यार्थी आणि नागरिकांना या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी केले आहे.
मोहिमेची वैशिष्ट्ये:
🔸 ८ ऑगस्ट रोजी मोहिमेचा जिल्हास्तरावर शुभारंभ
🔸 "स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा" शालेय विद्यार्थ्यांमार्फत
🔸 ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान सार्वजनिक स्वच्छता मोहीम, रॅली, पाणी स्रोतांची स्वच्छता
🔸 १२ ऑगस्ट: WASH पायाभूत सुविधांचे सजावट व तिरंगा थीम रंगकाम
🔸 १३ ऑगस्ट: स्वच्छता संवाद व जनजागृती उपक्रम
🔸 १४ ऑगस्ट: ध्वजारोहणासाठी तयारी व स्वच्छता
🔸 १५ ऑगस्ट: प्रत्येक घरावर तिरंगा फडकवणे, सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण व स्वयंसेवकांचा सत्कार
हॅशटॅग मोहिम:
#HarGharSwachhta आणि #HarGharTiranga या दोन हॅशटॅगच्या माध्यमातून मोहिमेचे वृत्त समाजमाध्यमांतून दररोज प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे.
उद्दिष्ट:
या आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांद्वारे स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवणे, स्वतंत्रतेचा उत्सव एकत्र साजरा करणे, आणि ग्रामीण भागात जल व स्वच्छता सुविधांच्या संवर्धनास चालना देणे हाच मुख्य उद्देश आहे.
“मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्या निर्देशानुसार पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी यांनी याबाबत सर्व गट विकास अधिकारी यांना पत्राद्वारे ही मोहिम राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.”
0 Response to "हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ मोहीम प्रभावीपणे राबवा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांचे आवाहन"
Post a Comment