-->

शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा



 साप्ताहिक सागर आदित्य 

शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा


‘आप’ची कृषि मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


वाशिम : शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी 14 ऑगस्ट रोजी आम आदमी पक्षाचे राम पाटील डोरले यांनी राज्याचे कृषिमंत्री व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केले की, ७ ऑगस्ट रोजी आत्मा विभागाच्या वतीने ‘शाश्वत शेती दिन’ निमित्त शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था असतानाही काही अधिकाऱ्यांनी आधीच जेवण करून घेतल्यामुळे शेतकरी उपाशी राहिल्याची गंभीर बाब समोर आली. या प्रकरणी विचारणा केली असता आत्मा विभागाच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी शेतकऱ्यांशी अरेरावी केली. एवढेच नव्हे तर एका शेतकऱ्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू केले असता, त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डोरले यांनी निवेदनात नमूद केले की, शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्यांचा अपमान असह्य आहे. कृषिमंत्री पालक असलेल्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांशी अन्यायकारक वर्तन होणे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

.......

0 Response to "शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article